खुशखबर! १२ ते १४ वयोगटातील मुलांचे ‘या’ तारखेपासून लसीकरण!

91

गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. या लसीकरण मोहिमेच्या पुढील टप्प्यात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वयवर्ष १२ ते १४ या वयोगटातील लहान मुलांसाठी या आठवड्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. या वयोगटातील सर्व मुलांचे १६ मार्चपासून लसीकरण केले जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तसेच ६० वर्षांवरील सर्व वृद्धांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

( हेही वाचा : चहा- काॅफीचे व्यसन जरा कमी करा, कारण )

‘या’ कंपनीची लस देणार

१२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स या कंपनीची लस देण्यात येणार आहे. मागील वर्षी १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात झाली होती. यानंतर केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला होता. आजवर कोरोना लसीचे एकूण १८० कोटी १९ लाख ४५ हजार ७७९ डोस देण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी केले ट्वीट

मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित असेल. मला कळवण्यास आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू होणार आहे. तर ६० वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस मिळणार आहे. मी लहान मुलांचे पालक आणि ६० वर्षावरील नागरिकांना विनंती करतो की, लसीकरण अवश्य पूर्ण करा असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.