India Vs Canada : जागतिक पातळीवर कॅनडा पडतोय एकाकी

128
India Vs Canada : जागतिक पातळीवर कॅनडा पडतोय एकाकी
India Vs Canada : जागतिक पातळीवर कॅनडा पडतोय एकाकी

ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन

राजकीय अस्तित्व रसातळाला जात असल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले. (India Vs Canada) कॅनडातील २०२१ च्या जनगणनेनुसार तिथे शिखांची लोकसंख्या ७ लाख ७० हजार एवढी आहे. पुढच्या वर्षी या देशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करण्यासाठी ट्रुडो यांनी तेथील खलिस्तान्यांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे. पण ट्रुडो यांच्या दुर्दैवाने त्यांचा डाव फसला. त्यांच्या आरोपांना पाश्चिमात्य देशांनी कवडीचीही किंमत दिली नाही. खुद्द अमेरिकेने या आरोपावर कॅनडाकडे पुरावे मागितले. कॅनडाने जी ७ देशांकडेही हा विषय नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यात यश आले नाही. आता आशिया खंडातील श्रीलंका आणि बांगलादेशनेही भारताची बाजू घेतली आहे. (India Vs Canada)

(हेही वाचा – Panvel : रेल्वे प्रवाशांचा सुटकेचा निश्वास; पनवेलच्या एका लेनवरून वाहतूक सुरु)

कॅनडामधील जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारने खलिस्तानी चळवळीला पाठिंबा दिला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाने भारत सरकारवर आरोप केले आहेत. कॅनडाच्या या आरोपाच्या प्रकरणी अन्य देशांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे; कारण त्यांना भारताला दुखवायचे नाही. कॅनडाने जी ७ देशांकडेही हा विषय नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. जस्टिन ट्रुडो यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी केलेल्या या कृतीमुळे कॅनडा एकाकी पडले आहे. याची जाणीव झाल्यानंतर आता कॅनडाने काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे.

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ट्रुडो यांची धडपड

कॅनडात खलिस्तानी दहशतवादामध्ये कुणालाही रस नाही. वास्तव हे आहे की, कॅनडातील जस्टिन ट्रुडो यांचे सरकार अल्पमतात आले आहे. जस्टिन ट्रुडो हे आता कॅनडामध्ये दुसऱ्या क्रमांकाला गेले आहेत. त्यांना सरकार वाचवण्यासाठी मोठ्या पक्षांची मदत लागते. जगमित सिंग हे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे कॅनडामध्ये २१ खासदार आहेत. तेथील विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे हे पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे शिख मतपेटी असलेल्या जगमित सिंग यांना खूश करण्यासाठी जस्टिन ट्रुडो हे असे आरोप करत आहेत. कॅनडामध्ये शीख लोकसंख्या ३ लाखांच्या आसपास आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जस्टिन ट्रुडो धडपड करत आहेत. पुढील काही महिन्यातच कॅनडामध्ये निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे सर्व चालू आहे. कॅनडाच्या राजकारणात अलीकडे चीनची ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात होत आहे. जस्टिन ट्रुडो यांच्यावर चिनी हस्तक्षेप वाढवल्याचा आरोप त्यांच्या देशातील नेते करत आहेत. त्यावरून लक्ष हटवण्यासाठीही जस्टिन ट्रुडो अशा प्रकारे वातावरण निर्माण करत आहेत. कॅनडाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. त्यासह भारताने कॅनडाला धोकादायक देश म्हणून घोषित करावे; म्हणजे भारतीय पर्यटक कॅनडामध्ये पर्यटनाला जाणार नाहीत. (India Vs Canada)

भारताचा रोष ओढवल्याने ट्रुडो यांचा पाय आणखी खोलात

१. दरवर्षी कॅनडामधून २ ते ३ लाख नागरिक भारतात येतात. त्यांना आता भारतात येता येणार नाही.
२. भारतातून २ ते अडीच लाख विद्यार्थी कॅनडामध्ये शिकायला जातात. आता निर्बंध आल्यामुळे ते कॅनडामध्ये शिकायला जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे विशेष नुकसान होणार नाही; कारण आता सर्व प्रकारचे आधुनिक शिक्षण भारतात मिळते. तसेच जे शिक्षण कॅनडात मिळते, ते अन्य कोणत्याही देशात मिळू शकते. मात्र कॅनडाचे विद्यार्थी कमी होतील.
३. कॅनडाची लोकसंख्या कमी आहे; म्हणजे साधारण ३८ कोटींच्या आसपास आहे. तसेच तेथील जन्मदरही कमी आहे. त्यामुळे त्यांना दरवर्षी ७-८ लाख नवीन लोकांची आवश्यकता लागते. त्यातील १० ते १५ टक्के भारतीय असतात. आता तिही संख्या कमी होईल. कॅनडाला कुशल मनुष्यबळ कमी पडेल.
४. भारत दरवर्षी ९-१० अब्ज कोटी रुपयांची तूरडाळ आयात करतो. त्यातील अर्धी डाळ आपण कॅनडाकडून आयात करतो. कॅनडाने भारताला तूरडाळ देणे बंद केले, तर भारत अन्य देशांकडून ती आयात करेल. त्याने डाळीच्या किंमतीवर काही प्रमाणात नक्की फरक पडेल; परंतु भारताला अन्य कोणत्याही देशाकडून डाळ मिळेल. कॅनडाची मात्र विक्री कमी होईल.
५. कॅनडा हा खूपच लहान देश असल्यामुळे भारतासमोर त्याची सामरिक क्षमता काहीच नाही. ते फक्त बोलू शकतात. त्यामुळे भारताला तोही धोका नाही. त्यामुळे हा विषय फार वाढण्याची शक्यता नाही.

पंजाबी लोकांचा ओढा कॅनडाकडे का ?

पंजाबमध्ये नार्कोटिक्स टेररिझम मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. पाकिस्तान आणि आयएसआयकडून येथे अफू, गांजा, चरस मोठ्या प्रमाणात पुरवले जातात. अनेक युवक अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पंजाबमधील पालकांना आता वाटते की, आपली मुले अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापेक्षा त्यांनी विदेशात जाऊन रहावे. वस्तूस्थिती अशी आहे की, पंजाबमध्ये आता स्थानिक लोक शेती करत नाहीत. तेथील शेती, उद्योग बाहेरचे म्हणजे बिहारी, बंगाली लोक करत आहेत. बहुतेकांना जमिनी विकून कॅनडामध्ये जाऊन रहायचे आहे. कॅनडामधून खलिस्तानी चळवळ चालवणारेही पंजाबच्या शिखांना आमीष दाखवतात. पंजाबमधले अनेक गँगस्टर्स कॅनडामध्ये पळून जातात. कॅनडामध्ये प्रवेश घेणे अन्य देशांच्या तुलनेत सोपे आहे. तिथे शीख लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पंजाबमधील शीख पंजाबमध्ये आमच्यावर अत्याचार होत आहेत, छळ होत आहेत, असे वातावरण निर्माण करून कॅनडामध्ये प्रवेश मिळवतात. अत्यंत शिस्तबद्ध रितीने पंजाब पोखरण्याचे षडयंत्र चालू आहे.

एकीकडे शिख लोक कॅनडामध्ये स्थलांतर करत आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तान आणि आयएसआयच्या माध्यमातून पंजाबमध्ये प्रचंड प्रमाणात अमली पदार्थ पेरत आहेत. यापेक्षा पंजाबचे अजून काय वाईट होऊ शकते !

खलिस्तानी कॅनडामध्येच खलिस्तान निर्माण का करत नाहीत ?

कॅनडामधील शिख खलिस्तानी चळवळ चालवण्यासाठी भारतातील शिखांना चिथावत असतात. याविषयी पंजाबच्या माजी पोलीस महासंचालकांनी चांगले विधान केले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, खलिस्तानी कॅनडामध्येच खलिस्तान निर्माण का करत नाहीत ? तिथे त्यांची संख्या अधिक आहे. उद्योग-व्यवसायावर वर्चस्व आहे, तर त्यांना कॅनडामध्येच खलिस्तान निर्माण करणे सोपे आहे. या पोलीस महासंचालकांच्या वक्तव्यात तथ्यही आहे. (India Vs Canada)

शब्दांकन : सायली डिंगरे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.