Mumbai-Pune Passenger: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी साठी महत्त्वाची बातमी; एक्स्प्रेस, लोकल गाड्या रद्द तर काहींच्या वेळात बदल

चिंचवड-खडकी स्टेशन दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

81
Mumbai-Pune Passenger: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी साठी महत्त्वाची बातमी; एक्स्प्रेस, लोकल गाड्या रद्द तर काहींच्या वेळात बदल
Mumbai-Pune Passenger: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी साठी महत्त्वाची बातमी; एक्स्प्रेस, लोकल गाड्या रद्द तर काहींच्या वेळात बदल

पुणे विभागातील लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड-खडकी स्टेशन दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन आटोमेटिक सिग्नलिंग बाबतीत महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. यामुळे काही एक्स्प्रेस गाड्या तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

या एक्स्प्रेस गाड्या रद्द
रविवार दिनांक २० ऑगस्टला गाडी क्रमांक 12127/12128 पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी, 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन, 12125/12126 पुणे-मुंबई-पुणे प्रगति, 11029/11030 मुंबई-कोल्हापुर-मुंबई कोयना एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर या लोकल रद्द 
पुणे ते तळेगाव : 06.48 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01584, 08.53 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01586 तसेच
पुणे ते लोणावळा : 06.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01558, 09.57 वाजता सुटणारी लोकल 01562,11.17 वाजता सुटणारी लोकल 01564, 15.00 वाजता सुटणारी लोकल 01566, 16.25 वाजता सुटणारी लोकल 01568 रद्द राहील.
शिवाजीनगर ते तळेगाव : 15.47 वाजता सुटणारी लोकल 01588 , 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 तसेच
शिवाजीनगर ते लोणावळा : 08.10 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01560 रद्द राहील.

तसेच लोणावळा वरून 06.30 वाजता शिवाजीनगरसाठी सुटणारी लोकल क्रमांक 01553, 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, 15.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01563, तळेगाववरून 07.48 वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक 01585, 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01587, 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळा वरून 07.25 वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक 01555, 08.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01557, 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.