Weather Update : येत्या ४८ तासांत आणखी एक चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरातील दक्षिणेच्या खोल दबाव क्षेत्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

168
Weather Update : येत्या ४८ तासांत आणखी एक चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : येत्या ४८ तासांत आणखी एक चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

देशात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी इशारा दिला आहे की, बंगालच्या दक्षिण पूर्व खाडी आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हळूहळू ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची चिन्हं आहेत. २ डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या मिचांग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update )

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे येत्या ४८ तासांत नैऋत्य आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे २५ ते३५ किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकते. त्याचबरोबरहे वारे ताशी ४५ किलोमीटर प्रति वेगाने किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Weather Update )

(हेही वाचा : Nasa Offer : नासाची इस्रोला मोठी ऑफर, २०२४ मध्ये अंतराळात भारत रचणार इतिहास)

या राज्यात वादळी पावसाचा इशारा
पुढील ५ दिवसांत दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथे पुढील ५ दिवस पाऊस होऊ शकतो. २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर केरळ आणि माहेमध्ये ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला आणि आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये २ आणि ३ डिसेंबरला मुसळधार पाऊस पडेल. (Weather Update )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.