Hottest city in india: एप्रिलचा अखेरचा रविवार अत्यंत उकाड्याचा ठरला. राज्यातील अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागानुसार, ४६.९ अंश सेल्सिअस तापमानासह अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर आधी थांबा आणि तापमानाची माहिती करून घ्या.
अकोल्यापाठोपाठ तापमानात (Amravati) अमरावती (४६.८), (Vardha) वर्धा (४६.४), (Yavatmal) यवतमाळ (४६) आणि (Nagpur) नागपूर (४५.४) चा क्रमांक लागला आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीत माथेरान-महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन ‘चिल’ होणार असाल. या ठिकाणांच्या कमाल तापमानाची नोंद ३३ अंशांच्या पार गेलेलं आहे.
हेही वाचा – Rising Temperatures: उष्माघातामुळे डिहायड्रेशनच्या तक्रारींत वाढ, सतर्कतेबाबत तज्ज्ञांनी दिला सल्ला
रविवारी देशातील १६ सर्वात उष्ण शहरांपैकी सहा शहरं महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील होती. अकोला ४६.९ अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण होतं, तर विदर्भाबाहेरील पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेला होता.
सोलापूरमध्ये कमाल तापमान ४३ अंश, तर किमान तापमान २६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ४१.४ अंश कमाल तापमान नोंदवले गेले, तर कोल्हापूरमध्ये त्यामानाने कमी, म्हणजेच ३७.६ अंश कमाल आणि २५.३ अंश किमान तापमान नोंदवले गेले. पुण्यात तापमान ४१.८ अंशांच्या वर गेले. नाशिकमध्ये ४१.५, बीडमध्ये ४१.९ आणि अहिल्यानगरमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
थंड हवेच्या ठिकाणीही वातावरण गरम
विशेष महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं (Matheran-Mahabaleshwar) म्हणून ओळखली जाणारी पर्यटन स्थळंही उष्म्यापासून सुटली नाहीत. हिल्स स्टेशनपैकी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे किमान तापमानात ३.९° (temperature) अंशांची वाढ होऊन ते २३.४ वर पोहोचले. पुणेजवळील लोहगावचा अपवाद वगळता, राज्यातील तापमानातील ही सर्वात मोठी वाढ ठरली. लोहगावमध्ये रात्रीचे तापमान ५.३ अंश सेल्सिअसने वाढले होते. महाबळेश्वरचे कमाल तापमान ३३.७ अंश नोंदवले गेले. तर माथेरानमध्ये रविवारी कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

