राज्य कामगार विमा योजनेंतर्गत Hospitals होणार अत्याधुनिक

46
राज्य कामगार विमा योजनेंतर्गत Hospitals होणार अत्याधुनिक
  • प्रतिनिधी

राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांना (Hospitals) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री अद्ययावत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकर, संचालक (प्रशासन) सोहम वायाळ, उपसंचालक सचिन देसाई यांच्यासह राज्यातील विविध कामगार विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Koneru Humpy : कोनेरू हम्पीला फिडे महिला बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स विजेतेपद)

मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, रेशन दुकानदार, पतसंस्था कर्मचारी आणि शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. रुग्णालयातील (Hospitals) रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरांचे आयोजन करावे आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच, रुग्णालयांचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. शासनाकडून यंत्रसामग्री आणि साहित्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही केली जाईल. डायलिसिस यासारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि जलदगतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

(हेही वाचा – Indo – Pak Cricket : पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाक क्रिकेटचं काय होणार?)

कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात आणि जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री आबिटकर यांनी पुढे सांगितले की, या सूचनांचा एक महिन्यानंतर पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांचा (Hospitals) दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.