Municipal Hospital : रुग्णालयीन स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे कामगारांची मागणी

रुग्ण वाढ होत असताना कामगार संख्येत मात्र वाढ झालेली नाही

195
Municipal Hospital : रुग्णालयीन स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे कामगारांची मागणी
Municipal Hospital : रुग्णालयीन स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे कामगारांची मागणी

सध्या मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे रुग्णालयीन सेवेची पाहणी करण्यासाठी भेट देऊन पाहणी करत आहेत. रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी रुग्णालयातील सर्व विभागातील आवश्यक बदल करण्याकडे त्यांनी लक्ष दिले आहे. तसेच रुग्णालयीन स्वच्छतेकडे त्यांनी लक्ष दिले आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे रुग्णालयीन स्वच्छतेकडे भर देत आता पालिका रुग्णालयाचा दर्जा वाढवल्याने कामगारांनीही त्यांचे कौतुक केले आहे. त्याचसोबत कामगारांच्या इतर ही मागण्यांकडे तसेच वस्तु पुरवठ्यांकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली आहे

यावर बोलताना म्युनिसिपल मजदूर युनियनच्या प्रदीप नारकर यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम पाहून कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या, अडचणी व मागण्याबाबत त्वरित निराकरण होतील अशा आशा निर्माण झाली आहे. प्रामुख्याने गरीब रुग्ण रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालये, दवाखाने, प्रसूतीगृह, सुतिकागृह अपुरी पडत आहेत. के. ई .एम., सायन, नायर व कुपर, राजावाडी, भगवती, भाभा तसेच शताब्दी रुग्णालयांसह सर्व छोट्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जेवढे रुग्ण खाटेवर ठेवले जातात, त्यापेक्षा अधिक रुग्णांना खाटांअभावी व्हरांड्यात फ्लोअर बेडवर ठेवले जाते. रुग्ण वाढ होत असताना कामगार संख्येत मात्र वाढ झालेली नाही.

(हेही वाचा – chocolate : चॉकलेट खायचे जसे तोटे तसे फायदेही जाणून घ्या…)

सहाव्या वेतन आयोगामध्ये राहून गेलेल्या त्रुटी व उणिवा दूर करणे, सातवा वेतन आयोग करार संपूर्ण भत्यासहित लागू करणे, बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची नोंद व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी, सामुदायिक वैद्यकीय गट विमा योजना लागू करून घेणे, रुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेले खाजगीकरण-कंत्राटीकरण कायमस्वरूपी बंद करून कायम कामगारांची नेमणूक करून घेणे, त्याचप्रमाणे अत्याधुनिक नवीन यंत्रसामुग्री तसेच नवीन कक्ष, आय सी. यू., ई. एम. एस., शस्त्रक्रिया विभाग या ठिकाणी लागणारे सर्व संवर्गातील कार्मचारी पदे निर्माण करणे यातील एकाही समस्येचे निराकरण झालेले नसल्याची तक्रार कामगार संघटनेने केली. याबाबींचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी अशी मागणी म्युनिसिपल मजदुर युनियनकडून करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.