होळीबाबत ‘गुगल’चे पंचांग चुकले…

110

दसरा-दिवाळी संपली आता नवीन वर्षाची प्रतीक्षा सुरु झाली आहे. नवीन वर्षांत कोणत्या दिवशी कोणते सण येतात, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. मग त्यासाठी सगळेच जण गुगलवर शोधाशोध करत आहेत. वर्षाच्या सुरुवातीचा मकर संक्रातीनंतर दुसरा सण होळी येतो. त्यामुळे साहजिकच नवीन वर्षांतील सण शोधताना आपसूकच होळी कधी आहे, याचा शोध गुगलवर केला जात आहे, मात्र गुगलने होळीबद्दल सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. कारण गुगल ज्या दिवशी होळी असल्याचे सांगत आहे, मुळात त्या दिवशी होळी नाही, असे पंचांगकर्ते सांगत आहेत.

काय दाखवते गुगल? 

गुगलमध्ये होळी पौर्णिमा ७ मार्च रोजी दाखवली जात आहे, तर धूलिवंदन हे ८ मार्च रोजी असल्याचे दाखवत आहे. मात्र ही माहिती चुकीचे असल्याचे समोर आले आहे, पंचागकर्ते यांनी गुगलचा हा दावा खोटा ठरवला आहे. कदाचित उत्तर भारतातील जनतेला ध्यानात घेऊन गुगल ही तारीख सांगत असेल, असे खगोलशास्त्रज्ञ् दा.कृ. सोमण सांगत आहेत. उत्तर भारतात प्रदोष ऐवजी भद्राला महत्व देतात, त्यामुळे प्रदोषनंतर पौर्णिमा सुरु होते, याकडे उत्तर भारतीय फार लक्ष देत नसावेत असे दा.कृ. सोमण म्हणाले.

(हेही वाचा boycott adipurush : ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा निर्माता घाबरला, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे)

महाराष्ट्रात होळी ६ मार्च रोजीच! 

प्रदोषला विशेष महत्व असते. ६ मार्च रोजी सूर्यास्तानंतर २ तास प्रदोष काळ असतो, त्यावेळी पौर्णिमा सुरु होते, त्या काळात होळीचे दहन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्रदोषला महत्व दिले जाते, म्हणून महाराष्ट्रातील सर्व दिनदर्शिकांमध्ये होळी दहन ६ मार्च रोजी होते, तर ७ मार्च रोजी धूलिवंदन येते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दिनदर्शिकांमध्ये ६ मार्च होळी पौर्णिमा आहे, तर ७ मार्च रोजी धूलिवंदन आहे, असे दा.कृ. सोमण म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.