Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी

92
Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा (Heavy Rain) रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरीमध्ये मुसळधार (Heavy Rain) ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Landslide : मुंबई – गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प)

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट (Heavy Rain) देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने देखील इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांना २६ आणि २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.