Heavy Rain : मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

112
Heavy Rain : मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आज मंगळवार, २५जुलै) मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी

सततच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रणा सतर्क झाल्या असून मदतीसाठी सहा अग्निशमन केंद्रांबरोबर तीन ठिकाणी रेस्क्यू पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या ७२ जवानांबरोबरच स्थानिक संस्थांचे १५ जवान सज्ज आहेत. त्यांच्या मदतीसाठी तीन रेस्क्यू व्हॅन, १२ बोटी, रूग्णवाहिका, ट्रॅक्टर ट्रॉली, पाणी उपशाचे पंपही ठेवले आहेत.

(हेही वाचा – Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम परीक्षेतील ४९ टक्के विद्यार्थी दुसऱ्या प्रयत्नातही नापास)

पावसामुळे २ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. तब्बल २ लाख ३७ हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.