Heavy Rain In Himachal Pradesh : दरड कोसळल्याने ३० पेक्षा अधिक भाविक शिव मंदिराखाली अडकले

138
Heavy Rain In Himachal Pradesh : दरड कोसळल्याने ३० पेक्षा अधिक भाविक शिव मंदिराखाली अडकले

देशाच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही भागामध्ये पावसामुळे (Heavy Rain In Himachal Pradesh) जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्टच्या दरम्यान मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे.

(हेही वाचा – India Migration Policy : देशातील कुशल तंत्रज्ञांना परदेशात संधी मिळावी यासाठी केंद्र सरकार करणार युरोपीयन देशांशी करार)

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे शिमलाच्या समरहिलमध्ये भूस्खलन (Heavy Rain In Himachal Pradesh) झाले आहे. यामध्ये एक शिव मंदिर कोसळल्याने त्याखाली ३० पेक्षा अधिक भाविक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरु आहे. आज सोमवार असल्याने अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी एकत्र जमले होते.

ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू

भूस्खलनासोबतच हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे (Heavy Rain In Himachal Pradesh) देखील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलन जिल्ह्यात रविवारी (१३ ऑगस्ट) रात्री उशिरा ढगफुटीमुळे पुरासोबत आलेल्या ढिगाऱ्यात दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला आहे. या ढगफुटीमुळे (Heavy Rain In Himachal Pradesh) आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत. तसेच पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. याशिवाय दरड कोसळल्याने अनेक महामार्ग आणि रस्ते बंद झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.