Hawkers Free Railway Station : फेरीवाल्यांचा होतोय अतिरेक…

496
Hawkers Free Railway Station : फेरीवाल्यांचा होतोय अतिरेक...
Hawkers Free Railway Station : फेरीवाल्यांचा होतोय अतिरेक...
मुंबई महापालिकेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करून पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेला यश येत असून महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या या कारवाई नंतर हा परिसर फेरीवालामुक्त दिसत असला तरी काही मोजक्याच फेरीवाल्यांकडून अतिरेक होत असल्याची निदर्शनास येत आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर पथकाची  पाठ फिरताच काही उपरे  फेरीवाले पुन्हा व्यवसाय  थाटण्याचा चोरी छुपा प्रयत्न करत आहेत.  याचा परिणाम स्थानिक आणि मराठी फेरीवाल्यांवर होताना दिसत आहे. सातत्यपूर्ण कारवाई करून महापालिकेची अधिकारी ही कारवाई यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असेल तरी काही फेरीवाल्यांकडून ही मोहीम फेल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे असे फेरीवाले  महापालिकेच्या रडारवर येणार आहेत. (Hawkers Free Railway Station)
 मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानंतर मागील शुक्रवार पासून फेरीवाल्यां  विरोधात धडक कारवाई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या परवाना विभाग व अतिक्रमण  निर्मूलन विभाग आदींच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या कारवाई मोहिमेत मुंबईतील तब्बल सतरा ते अठरा प्रमुख रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम राबवली जात आहे. (Hawkers With Railway Station)
महापालिकेच्या वतीने शनिवारपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली असून दादर (Dadar), कुर्ला (Kurla), घाटकोपर, बोरीवली आधी परिसर फेरीवाला मुक्त  करण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यात येत असल्याने फेरीवाल्यांना व्यवसाय करता येत नाही. मात्र, महापालिकेने ही कारवाई कडक केल्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची हिम्मतही होत नाही. पण एका बाजूला महापालिकेने ही कारवाई कडक केली असली तरी काही भाडोत्री तथा उपरे फेरीवाले हे प्रशासनातील अधिकाऱ्यांची पाठ फिरताच, पुन्हा फेरीचा व्यवसाय काढण्याचा प्रयत्न करत असतात, असे निदर्शनास आलेले आहे. महापालिकेची कारवाई तीव्र असताना काही फेरीवाले महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने आणि ही कारवाई यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार करत असल्याने महापालिकेच्या या कारवाईची  झलक  दिसून येत नाही. (Hawkers Free Railway Station)
दरम्यान,दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात येत असतानाच रानडे मार्गावर नक्षत्र मॉल समोर रस्त्याच्या पलिकडे लस्सी दुकानाजवळ काही विशिष्ट धर्माचे तरुण बिनधास्तपणे व्यवसाय करत होते. एका बाजूला महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मान राखत तसेच कारवाईचा सन्मान करत स्थानिक आणि मराठी फेरीवाले है धंदे बंद करून बसलेले असताना या लोकांकडून व्यवसाय केले जात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना व्यवसाय करण्यास अटकाव केला. दादर मधील फेरीवाल्यांची मस्ती ही बाहेरील आणि विशिष्ट धर्माच्या लोकांमुळे वाढल्याने आज लोकांना चालताना त्रास होत आहे. यामुळे या कारवाई मुळे दादरकर प्रचंड खुष दिसून येत असून ही कारवाई सातत्य पूर्ण राहावी, नौटंकी पुरती राहू नये अशीच प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. (Hawkers Free Railway Station)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.