Pune Metro : कष्टकरी, कामगारांनी अनुभवली पुणे मेट्रोची सफर

135

कष्टकरी, कामगार, सफाई कर्मचारी, भाजीविक्रेते अशा श्रमिक घटकांतील बंधू-भगिनींनी बुधवारी पुणे मेट्रोची सफर अनुभवली. बोपोडी ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते बोपोडी अशी मेट्रोची सफर केलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना होती.

माजी उपमहापौर सुनीता वाडेकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून बोपोडी भागातील कष्टकरी, श्रमिकांसाठी पुणे मेट्रोची सफर घडविण्यात आली. तसेच ढोलताशाचे वादन करून, उपस्थितांना लाडू भारावून पुणे मेट्रोचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभागातील शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला.

(हेही वाचा Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा)

परशुराम वाडेकर म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पिंपरी ते शिवाजीनगर आणि रुबी हॉल ते वनाज या दोन मार्गिकांचे लोकार्पण केले. या निमित्ताने मेट्रोच्या या नव्या मार्गिकांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. बोपोडी भागातील श्रमिक, कष्टकरी, कामगार, सफाई कर्मचारी, भाजी विक्रेते, झोपडपट्टी भागातील विद्यार्थी यांना बोपोडी मेट्रो स्टेशन ते शिवाजीनगर सिविल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोची अनोखी सफर घडविण्यात आली.”

“पुणेकर जनतेला मेट्रोची अनोखी भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अभिनंदन करतो. गोरगरीब जनतेला सरकारच्या या प्रगतिशील कामाचा अनुभव द्यावा, या उद्देशाने हा अनोखा कार्यक्रम आयोजिला होता,” असे सुनीता वाडेकर यांनी सांगितले.

“पहिल्यांदाच मेट्रोमधून प्रवास करताना खूप मजा आली. रोजच्या वाहतूक कोंडीतून एक आरामदायी आणि मोकळा प्रवास करता आला. सर्व सोयीसुविधा मनाला भावणाऱ्या आहेत. या अनोख्या भेटीबद्दल वाडेकर दाम्पत्याचे आम्ही आभार मानतो,” अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.