Independence Day : ठाण्यातील ‘हॅप्पी वॅली’कडून स्वातंत्र्यदिनी परमवीर चक्र सन्मानित यांची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे अनावरण  

90
ठाण्यातील ‘हॅप्पी वॅली’ संकुलातील ‘फेस वन’मधील रहिवाशांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी परमवीर चक्र सन्मानित यांची ओळख, तसेच त्यांच्या शौर्याबद्दलची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी हॅपी वॅली फेडरेशनचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण, ‘हॅप्पी वॅली फेस वन’ चे अध्यक्ष शैलेद्र चिखलकर, फेडरेशनचे पदाधिकारी, फेसवनचे पदाधिकरी आणि मोठ्या प्रमाणात रहिवाशी उपस्थित होते.
picture
ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजीनी वाडी नजीक असलेल्या  ‘हॅपी वॅली’होम फेडरेशन मर्यादित या गृह संकुलातील फेस वनच्या वतीने भारताच्या ७६व्या स्वातंत्रदिनानिमित्त २१ परमवीर चक्र सन्मानित यांच्या चित्र प्रदर्शनाचे अनवारण करण्यात आले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ‘फेस वन’मध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे कौतुक करत त्यांनी सुरू केलेला उपक्रम पुढेही असाच सुरू ठेवावा, असे म्हटले.
देशासाठी लढणाऱ्या परमवीर चक्र सन्मानित वीरांची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी फेसवनकडून या संकुलातील ६ इमारतींच्या आवारात परमवीर चक्र सन्मानित जवानांची ओळख व माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे अनावरण एका विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. फेसवनचे अध्यक्ष शैलेंद्र चिखलकर आणि कार्यकारणी मंडळाकडून ही संकल्पना मांडण्यात आली होती.
मागील वर्षांपासून आम्ही आमच्या सोसायटीत वेगवेगळे उपक्रम राबवतो. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील आणि देशातील थोर क्रांतिकारक यांचे चित्र प्रदर्शन सोसायटीच्या आवारात लावण्यात आले होते. यावेळी २१ परमवीर चक्र यांचा सन्मान करण्यात आला, त्यांचे चित्र प्रदर्शन बसविण्यात आले आहे. जेणेकरून नवीन पिढीला परमवीर चक्र सन्मानित वीर जवानांची माहिती होईल, तसेच तरुणपिढीला त्यांच्यापासून  प्रेरणा मिळेल, असा या मागील उद्देश आहे, असे फेसवनचे अध्यक्ष शैलेंद्र चिखलकर यांनी सांगितले.
या अनावरण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात रहिवासी आणि फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा तसेच या उपक्रमासाठी मेहनत घेणारे फेसवनचे पदाधिकारी आणि रहिवाशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.