Muslim : उत्तराखंडमध्ये हाफिजची विकृती; संतप्त लोकांनी मुंडन करुन केले पोलिसांच्या हवाली

108

उत्तराखंडच्या हल्व्दानीमध्ये धर्मांध मुसलमान हाफिजने अत्यंत विकृत कृती केली. त्याने गायीवर बलात्कार केला, ही घटना घडत असताना लोकांणी हाफिजला पकडले. त्यानंतर त्याचे मुंडन करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हाफिज हा मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूर येथील राहणारा आहे. सुरुवातीला त्याने त्याचे नाव नफिस असे सांगितले. त्याने हातात भगव्या रंगाचे गंडे दोरेही बांधले होते.

हे प्रकरण हल्द्वानीच्या मुखानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तिथे रहाणाऱ्या महेश चंद्रने बुधवारी, १४ जून रोजी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. महेशच्या सांगण्यानुसार त्यांनी आपली गाय चरण्यासाठी शेतात सोडली होती. दुपारी जेव्हा ते आपली गाय बघण्यासाठी गेले असता त्यांनी बागेत हाफिजची विकृती दिसली. महेशने धावत जाऊन हाफिजला पकडले. दरम्यान, इतर अनेक लोकही घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तो बरेली रोड, हल्द्वानी येथे राहत होता. ही घटना कळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी हाफिजला मारहाण करण्यास सुरुवात करुन त्याचे मुंडन केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हाफिजला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर आयपीसी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा) अभ्यासक्रमातून वगळला 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.