-
प्रतिनिधी
ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळांच्या (Gym) सुविधा बळकट करण्यासाठी राज्य सरकारने व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) २३ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधीची स्थापना; Startup साठी ३०० कोटींचा निधी मंजूर)
भरणे यांनी सांगितले की, २०१४ मध्ये व्यायामशाळा (Gym) बांधकामासाठी अनुदानाची मर्यादा २ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली होती. मात्र, गेल्या दशकात बांधकाम खर्चात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन ही मर्यादा आता १४ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. “हा निर्णय व्यायामशाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि तरुणांना खेळ आणि फिटनेससाठी प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे भरणे यांनी नमूद केले.
(हेही वाचा – धर्मादाय रुग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक तयार करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)
या अनुदानवाढीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळांना (Gym) आधुनिक सुविधा विकसित करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल. तसेच, स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नव्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र संस्थांना क्रीडा विभागाकडे अर्ज करावा लागेल. या निर्णयाचे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले असून, यामुळे राज्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community