Greta Thunberg ला दहशतवाद्यांचा पुळका; इस्रायलने केली मोठी कारवाई

47

इस्रायलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) आणि त्यांचे जहाज ताब्यात घेतले आहे. सोमवार, ९ जूनच्या पहाटे ५ इस्रायली स्पीड बोटींनी जहाजाला वेढा घातला. त्यानंतर, सैनिक जहाजावर चढले आणि ताब्यात घेतले. मॅडेलिन नावाच्या या जहाजात १२ लोक आहेत. सर्व जण सैन्याच्या ताब्यात आहेत. आता हे जहाज गाझाऐवजी इस्रायलला नेले जात आहे. (Israeli–Palestinian Conflict)

(हेही वाचा – https://www.marathi.hindusthanpost.com/special/dabholkar-murder-case-result-blast-leftist-mukta-dabholkar-hindu-terrorist-narrative-says-abhay-vartak/)

हे जहाज गाझामधील दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी मदत साहित्य घेऊन जात होते. १ जून रोजी थनबर्ग टीमसह इटलीच्या सिसिली बेटावरून निघाल्या. जाण्यापूर्वी ग्रेटाने एक विधान केले, जर मानवतेमध्ये थोडीही आशा शिल्लक असेल तर आपण पॅलेस्टाईनसाठी बोलले पाहिजे. हे अभियान कठीण आणि धोकादायक असू शकते, परंतु गाझामध्ये काय घडत आहे यावर मौन बाळगणे आणखी वाईट आहे.

ग्रेटा थनबर्गच्या गाझा उपस्थितीमुळे इस्रायलची प्रतिक्रिया अधिक आक्रमक होती. संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी “ज्यूविरोधी ग्रेटा आणि तिचे मित्र गाझाला पोहोचू शकत नाहीत” असे विधान केले आणि कोणत्याही परिस्थितीत या याटला रोखण्याचे आदेश सैन्याला दिले. ग्रेटाला थेट हमासच्या ‘दुष्प्रचाराचा भाग’ म्हटले गेले.

इस्रायलवर आतंकवादी हल्ले करणाऱ्या गाझा आणि पलेस्टाईनवर कारवाई करत आहे. त्या कारवाईविरोधात मानवतावादाचे गळे काढले जात आहेत. प्रत्यक्षात आतंकवादी हल्ल्यांमुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा येते, त्यांच्या मानवतेविषयी कोणीही बोलत नाही. (Greta Thunberg)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.