Dahi Handi : गोविंदांना मिळणार सरकारकडून विमा कवच

दहीहंडी समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश

93
Dahi Handi : गोविंदांना मिळणार सरकारकडून विमा कवच
Dahi Handi : गोविंदांना मिळणार सरकारकडून विमा कवच

दहीहंडी Dahi Handi उत्सवात हंड्या फोडण्यासाठी मानवी मनोरे बनवणाऱ्या गोविंदांना राज्य सरकार विमा देणार आहे. दहीहंडी समन्वय समितीने यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यानुसार ५० हजार गोविंदा पथकांना विमा संरक्षण देणार असल्याचे सरकाने जाहीर केले आहे.

दहीहंडीलाDahi Handi राज्य सरकारने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणारया गोविंदांचा विमा उतरवण्याबाबत दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकारयांनी सरकारसोबत नुकत्याच दोन बैठका केल्या. त्यात सरकारतर्फे गोविंदांना विमा संरक्षण पुरवण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ५० हजार गोविदांना विमा संरक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रतिगोविंदा ७५ रुपयांचा विमा हप्ता याप्रमाणे एकूण३७ लाख५०हजार इतका निधी संबंधित विमा कंपनीला अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीकडे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

(हेही वाचा : Ratan Tata : महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान)

हात, पाय किंवा डोळा गमावलेल्या गोविंदाला विमा कंपनीकडून ५ लाख रुपयांची भरपाईही दिली जाणार आहे. याशिवाय, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वावर विम्याच्या रकमेच्या काही टक्के भरपाई दिली जाईल. दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांचा एक लाख रुपयांपर्यंतचा उपचाराचा खर्चही संबंधित कंपनी उचलणार आहे.राज्यभरातील गोविंदा पथकांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे लवकरात लवकर संपर्क साधून विमा काढून घ्यावा,विमा ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच याचे अर्ज स्वीकारले जातील असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीकडून करण्यात आले आहे.

हेही पहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.