महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर अखेरीस सदस्यांच्या नियुक्त्या!

सदस्यांच्या नियुक्त्यांची माहिती विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली

119
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर अखेरीस सदस्यांच्या नियुक्त्या!
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर अखेरीस सदस्यांच्या नियुक्त्या!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर कुलपती व राज्याचे राज्यपाल रमेश बैस व प्रति-कुलपती हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी विविध सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. याबाबतची माहिती विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलपती यांच्या आदेशानुसार तसेच विद्यापीठ अधिनियमान्वये अधिसभेवर सहा सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राज्यातील प्रत्येक महसुल विभागातून एक प्रतिनिधी असे सहा सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विद्यापीठाच्या अधिसभेवर डॉ. पराग कांतिलाल संचेती, डॉ. अभय नारायण कुलकर्णी, डॉ. चेतना सुनिल गोरीवाले, डॉ. मीनल मोहन मोहगांवकर, डॉ. हेमलता राजेंद्र जळगांवकर व डॉ. गिरिष विठ्ठलराव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज)

तसेच विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडून कोकण विभागातून डॉ. विष्णु सी. बावणे, पुणे विभागातून डॉ. संतोष आर. गटणे, छत्रपती संभाजीनगर विभागातून डॉ. सचिन एस. उमरेकर, नाशिक विभागातून डॉ. विजय व्ही. भोकरे, अमरावती विभागातून डॉ. प्रसाद टी. बन्सोड आणि नागपूर विभागातून डॉ. आनंद ए. टेंभुर्णीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.