Gopinath Bordoloi International Airport: मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील विमानतळाचे छत अचानक कोसळले

तीव्र वादळामुळे विमानतळ प्राधिकरणाने कामकाज थांबवले आणि सहा उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली.

153
Gopinath Bordoloi International Airport: मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील विमानतळाचे छत अचानक कोसळले

जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे रविवारी गुवाहाटीतील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत कोसळले. अचानक छत कोसळून आत पाणी वाहू लागल्याने विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. खराब हवामानामुळे एल. जी. बी. आय. विमानतळावरील उड्डाण आधीच थांबले होते. मात्र, या अपघातामुळे कोणीही जखमी झाले नाही. (Gopinath Bordoloi International Airport)

तीव्र वादळामुळे विमानतळ प्राधिकरणाने कामकाज थांबवले आणि सहा उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली. मुख्य विमानतळ अधिकारी (सीएओ) उत्पल बरुआ यांनी पीटीआयला सांगितले की, वादळामुळे अदानी समूहाच्या नियंत्रणाखालील सुविधेच्या बाहेर ऑईल इंडिया कॉम्प्लेक्समध्ये एक मोठे झाड उन्मळून पडले आणि एक रस्ता बंद झाला.

(हेही वाचा – West Bengal Cyclone : पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा; ५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण जखमी)

सहा उड्डाणे वळवण्यात आली
गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी उत्पल बरुआ यांनी एएनआयला सांगितले की, सहा उड्डाणे वळवण्यात आली आहेत. एक मोठे झाड उन्मळून पडले आणि विमानतळाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला, मात्र टर्मिनलला इंधनाचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी लगेचच रस्ता मोकळा करण्यात आला.

बरुआ यांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, विमानतळाच्या छताचा उद्ध्वस्त झालेला भाग खूप जुना आहे. त्यामुळे तो प्रतिकूल हवामानाचा परिणाम सहन करू शकला नाही. “यामुळे छत तुटले आणि आत पाणी येऊ लागले, मात्र कोणतीही दुखापत झाली नाही आणि सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. “

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.