Gokhale Road Bridge : आयुक्त आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

716
Gokhale Road Bridge : आयुक्त आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा
Gokhale Road Bridge : आयुक्त आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

गोखले रोड पुलाच्या (Gokhale Road Bridge) बांधकामातील त्रुटी बाबत माजी पालकमंत्री आणि उबाठा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवून महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. गोखले पूल हे राजकारणी अधिकारी-कंत्राटदार यांच्या सगंनमताचे ढळढळीत उदाहरण आहे. जिथे स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह पुलाला अनेकदा भेट दिली. या भेटींमध्ये त्यांना दोष दिसला नाही का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दोन्ही यंत्रणा दोषारोपाच्या खेळात मग्न

आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पाठवलेल्या निवेदनात मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बाधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट झाली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे. तरीही दोन्ही यंत्रणा दोषारोपाच्या खेळात मग्न आहेत असे नमूद केले आहे.

कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी

या प्रकल्पातील मुख्य दायित्व असलेले महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत, अशी विनंती ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे. जेणेकरुन त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करुन गडबड करता येणार नाही. आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल. (Gokhale Road Bridge)

(हेही वाचा – Veer Savarkar : भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी स्थान देऊन कार्यक्रमाचे ‘मैत्र जीवांचे’ नाव सार्थ ठरवले)

आयुक्तांची बदली तर बऱ्याच काळापासून रखडली

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली तर बऱ्याच काळापासून रखडलेली आहे, आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत आहेत,असेही या पत्रात नमूद केले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अपेक्षित …

गोखले पूल हे राजकारणी अधिकारी-कंत्राटदार ह्यांच्या सगंनमताचे ढळढळीत उदाहरण आहे. जिथे स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह पुलाला अनेकदा भेट दिली. ह्या भेटींमध्ये त्यांना दोष दिसला नाही का? की मुद्दाम हा दोष निर्माण करण्यात आला होता. जेणेकरून आता दुसरा पूल तोडून पुन्हा बांधता येईल असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे आणि त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी आयुक्त आणि रेल्वेच्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे,अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. (Gokhale Road Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.