Gokhale Bridge : अंधेरी गोखले पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू

510
Gokhale Bridge : अंधेरी गोखले पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू
Gokhale Bridge : अंधेरी गोखले पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे (Gokhale Bridge) मुख्‍य बांधकाम १०० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्व संबंधित कामे पूर्ण होणार आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून गोखले पूल (Gokhale Bridge) वाहतुकीस खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी स्पष्ट केले.

IMG 20250425 WA0186 scaled

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांच्या केलेल्या हत्येचा निषेध)

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्‍या (Gokhale Bridge) दुसर्‍या टप्प्यातील कामाची पाहणी अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी केली. या पुलाचे मुख्‍य बांधकाम १०० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्‍यात रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ – उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलास जोडणाऱ्या ‘कनेक्टर’ कामाचा समावेश आहे. प्रा. ना. सी. फडके मार्गावरील तेली गल्ली पूल व गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) मधल्या भागाच्या कॉंक्रिट कामाचे ‘क्‍युरिंग’ शुक्रवारी २५ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण होत आहे. पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतरची अंतिम कामे, जी पुलाचा दर्जा, सुरक्षितता आणि सौंदर्य वाढवतात, ती वेगाने केली जात आहेत. अपघात प्रतिबंधक अडथळा, ध्वनिरोधक , कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी कामे अंतिम टप्‍प्‍यात आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत महानगरपालिका अधिका-यांचा संयुक्‍त पाहणी दौरा नुकताच झाला आहे.

(हेही वाचा – लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी कोर्टाचा मान ठेवणार का? मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उपस्थित केला सवाल)

जुहू – विलेपार्ले विकास योजना अंतर्गत उड्डाणपुलाच्‍या पूर्व दिशेकडील पोहोच रस्‍त्‍याचे काम सध्‍या सुरू आहे. बर्फीवाला पूल जेथे उतरतो त्‍याठिकाणचा बाजूचा रस्ता (Sleep Road) अरूंद आहे. त्‍यामुळे पोहोच रस्‍ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नव्‍याने कार्यान्वित होणा-या बर्फीवाला पुलाच्‍या दक्षिण भागातील उतारावरील वाहतूक सुरळीत होईल. जुहू जंक्‍शन गल्‍लीपासून वाहनांचे आवागमन योग्‍यप्रकारे होईल, असेदेखील अभिजीत बांगर यांनी नमूद केले. जुहू गल्ली जंक्शनपासून जुहू – विलेपार्ले विकास योजना कामकाज सुरु राहील. मात्र, त्या ठिकाणी बर्फीवाला पुलावरुन जाणाऱया वाहतुकीसाठी पुरेशा रुंदीचा रस्ता उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी केली.

प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते, बोरसे, दिनेश गांधी (Dinesh Gandhi) यांच्‍यासह संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.