Madrasa Funding : 80 मदरशांना 100 कोटी रुपयांहून अधिक फंडिंग; विशेष तपास पथकाच्या चौकशीत उघड

परदेशातून मिळालेला पैसा कशा प्रकारे खर्च झाला, याचा तपास करणार - मोहीत अग्रवाल

246
Madrasa Funding : 80 मदरशांना 100 कोटी रुपयांहून अधिक फंडिंग; विशेष तपास पथकाच्या चौकशीत उघड
Madrasa Funding : 80 मदरशांना 100 कोटी रुपयांहून अधिक फंडिंग; विशेष तपास पथकाच्या चौकशीत उघड

उत्तर प्रदेशच्या 80 मदरशांच्या तपासात केवळ 2 वर्षांत 100 कोटींहून अधिक फंडिंग झाल्याचे उघड झाले आहे. (Madrasa Funding) राज्यातील 108 मदरशांपैकी 80 मदरशांची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करण्यात आली. एस.आय.टी.च्या तपासात मदरशांना मोठ्या प्रमाणात परदेशी निधी मिळाल्याचे पुरावेही सापडले आहेत.

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच, सिद्धार्थनगर, श्रावस्ती, तसेच सहारनपूर, देवबंद, आझमगड, मोरादाबाद, रामपूर आणि अलीगढ या नेपाळ सीमेला जिल्ह्यातील मदरशांना आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत. (Madarasa In Uttarpradesh)

(हेही वाचा – Malabar Hill Reservoir : शहर भागातील जनतेला पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागणार!)

ज्या मुख्य मदरशांकडून इतर मदरशांना आर्थिक फंडिंग झाले, त्याचा तपास SIT करत आहे. एसआयटी टीमचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस महासंचालक मोहीत अग्रवाल हे करीत आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पैसा कशासाठी खर्च झाला, याचा तपास करणार – मोहीत अग्रवाल

उत्तर प्रदेशात जवळपास 24 हजार मदरसे आहेत. ज्यामध्ये 16 हजार 500 पेक्षा जास्त मदरशांना शिक्षण मंडळाकडून (Madrasa Education Board) मान्यता मिळालेली आहे. परदेशातून मिळालेला पैसा (Foreign Funding) कशा प्रकारे खर्च झाला, याचा तपास आम्ही करणार आहोत. शिवाय हेही तपासणार आहोत की, मिळालेला पैसा मदरशांना चालवण्यासाठी होता कि काही इतर कारवायांसाठी वापरला गेला आहे ?

एटीएसने मागवला संपूर्ण तपशील

SIT ने आता उत्तरप्रदेशच्या मदरशांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर संस्थांची (Central Intelligence Agencies) मदत मागितली आहे. वित्तपुरवठा करणारी संस्था कोण आहे ? पैसे कुठे पाठवले ? पैसे कसे हस्तांतरित केले गेले ? हे पैसे कोणत्या खात्यातून हस्तांतरित करण्यात आले ? या सर्वाचा तपास एसआयटी करणार आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : मी देखील तुमच्यातलाच एक आहे; पंतप्रधान मोदी यांनी केली ‘ही’ सूचना)

निधी मिळाल्यानंतर मदरशांमध्ये पैसे कुठे गेले ? खर्चाची पूर्ण रक्कम ? प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल. मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांची एकूण संख्या आणि निधीच्या संबंधांचीही चौकशी केली जाईल. एटीएसने निधीचा संपूर्ण तपशीलही मागितला आहे.

मान्यताप्राप्त 4394 मदरशांची चौकशी करणार

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तरप्रदेश सरकारने मदरशांना मिळणाऱ्या परदेशी निधीची चौकशी करण्यासाठी एडीजी, एटीएस आणि अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. आतापर्यंत राज्यातील केवळ मान्यताप्राप्त नसलेल्या मदरशांची चौकशी सुरू होती; परंतु आता राज्य सरकार मान्यताप्राप्त मदरशांचीही चौकशी करणार आहे. मदरसा शिक्षण परिषदेने मान्यताप्राप्त 4394 मदरशांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 560 सरकारी अनुदानित मदरशांच्या तपासणीने होईल. त्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Nawab Malik : नवाब मलिक अजित पवार गटात येताच मोहित कंबोज यांचे ट्विट; म्हणाले…)

मदरशांचा तपास पुढे ढकलण्याची मागणी

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनुदानित आणि मान्यताप्राप्त मदरशांचा तपास पुढे ढकलण्याची मागणी करणारे पत्र उत्तर प्रदेश मदरसा मंडळाच्या अध्यक्षांनी अल्पसंख्यांक कल्याण मंत्री धर्मपाल यांना लिहिले आहे. मंडळाचे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद म्हणतात की, वारंवार तपासणी आणि सर्वेक्षणांमुळे मदरशाच्या कामकाजावर परिणाम होतो. (Madrasa Funding)

हेही पहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.