Nawab Malik : नवाब मलिक अजित पवार गटात येताच मोहित कंबोज यांचे ट्विट; म्हणाले…

292

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) अधिवेशनात दाखल झाले आणि थेट अजित पवार गटात दाखल झाले आणि ते सत्ताधारी बाकावरील मागच्या बेंचवर जाऊन बसले. यावर आता भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात यावर सर्वांचे लक्ष लागले असताना मोहित कंबोज यांचे ट्विट मात्र आता जोरदार चर्चेत आले आहे.

काय म्हटले मोहित कंबोज? 

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासाठी हे नागपूरमधील शेवटचे विधानसभा अधिवेशन आहे. तुम्ही आता तुम्हाला वाटेल तिथे बसा, पण २०२४ मध्ये तुम्ही आमदार बनणार नाहीत, असा इशारा मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून दिला आहे. दरम्यान, नवाब मलिक अजित पवार गटात दाखल झाल्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. देशद्रोहाचा आरोप करून मांडीला मांडी लावून कसे बसू शकता, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) प्रत्यक्ष तुरुंगात असतानाही त्यांना मंत्रिपदावरून काढणार नाही, अशी भूमिका ज्यांच्या नेत्यांनी घेतली. ते आज इथे भूमिका मांडत आहेत. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजित पवार आहेत. त्यांच्या बाजूला छगन भुजबळ आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका, असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Maharashtra Assembly Winter Session : निवडणूक निकालाने विरोधक गलितगात्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.