Wuhan lab : चीनच्या वुहान लॅबला अमेरिकेचे फंडिंग बंद; कोरोना नडला 

143

अमेरिकेने चीनच्या वुहान व्हायरोलॉजी लॅबला Wuhan lab निधी देण्यावर बंदी घातली आहे. हा निधी संशोधन कार्यासाठी देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही संसदेने यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. कोविड-19च्या लीकशी संबंधित कागदपत्रे न पुरवल्याचा आणि सुरक्षा उपायांचे पालन न केल्याचा आरोप चीनवर आहे.

दुसरीकडे, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनने त्यांच्या देशातील कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांचा डेटा हटवला आहे. या अहवालात एका राज्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने जगासमोर शतकातील सर्वात मोठे संकट उभे केले होते. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार बायडेन सरकारने वुहान लॅबचा Wuhan lab निधी थांबवण्याचे आदेशही जारी केले आहेत. याबाबतची माहिती चीन सरकार आणि वुहान लॅबलाही देण्यात आली आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये यूएस हेल्थ सर्व्हिसने वुहान लॅबमधून कोविड-19 लीकची तपासणी सुरू केली होती. तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे लॅबने दिली नसल्याचे आढळून आले. याशिवाय अशा संवेदनशील प्रयोगशाळेत व्हायरसची गळती रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा नव्हती.

(हेही वाचा Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस? )

अहवालात पुढे म्हटले की, अमेरिकेने निर्णय घेतला आहे की, चीनच्या वुहान लॅबला यापुढे निधी दिला जाणार नाही. मात्र, जुलै 2020 पासून या प्रयोगशाळेला निधी मिळत नव्हता, मात्र आता याबाबतचा निर्णय अधिकृत पातळीवर कळविण्यात आला आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून Wuhan lab पसरलेल्या कोरोना विषाणूची लॅबमध्ये निर्मिती करण्यात आली होती. अमेरिकन शास्त्रज्ञ एंड्रयू हफ यांनी त्यांच्या ‘द ट्रुथ अबाऊट वुहान’ या पुस्तकात हा दावा केला आहे. तो म्हणतो की, चीनमध्ये कोरोना विषाणू निर्माण करण्याच्या प्रकल्पाला अमेरिकन सरकार निधी देत होते. हफनेही या लॅबमध्ये काम केले आहे.

वुहान लॅबमधून व्हायरस लीक

गतवर्षी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ ने कोविड-19 वर एक तपासात्मक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार हफ यांचे म्हणणे आहे की, वैज्ञानिकांनी तयार केलेला कोरोना विषाणू वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) Wuhan lab मधून लीक झाला होता. या प्रयोगशाळेसाठी चीन सरकार निधी देते. हफचा दावा आहे की सुरक्षा त्रुटीमुळे व्हायरस लीक झाला होता, त्यानंतर तो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.