Fraudulent YouTuber : विमानतळावरील शोरुममधून ‘हा’ युट्यूबर करत होता सोन्याची तस्करी

Fraudulent YouTuber : चेन्नई विमानतळावर एका युट्यूबरने शोरुम सुरू केली होती.

103
Fraudulent YouTuber : विमानतळावरील शोरुममधून 'हा' युट्यूबर करत होता सोन्याची तस्करी
  • ऋजुता लुकतुके

एका युट्यूरचे काळे कारनामे चेन्नई विमानतळावर बुधवारी उघड झाले आहेत. पण, पोलिसांच्या नजरेत येईपर्यंत या युट्यूबरने आपल्या शोरुममधून तब्बल १६७ कोटी रुपयांची सोन्याची तस्करी केलेली होती. नेमका काय प्रकार आहे ते बघूया. (Fraudulent YouTuber)

चेन्नई विमानतळावर आयात शुल्क विभागाच्या धडक कारवाईत एक धक्कादायक वास्तव उघड झालं. सबिर अली हा विमानतळावर शोरुम चालवणारा एक व्यक्ती युट्यूबरही आहे. त्याच्या दुकानात ७ नोकर आहेत. शिवाय दोन व्यक्ती तो प्रवासासाठी वापरतो. शॉपिंगबॉय्‌ज अशं त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याची सोन्याची तस्करी करण्याची आधुनिक पद्धत बघून पोलिसांनीही तोंडात बोटं घातली आहेत. (Fraudulent YouTuber)

(हेही वाचा – राज्यसभेत Sudha Murthy यांनी पहिल्याच भाषणात केल्या ‘या’ दोन मागण्या)

शोरुम उघडण्यासाठी दिले ७० लाख

मागच्या फक्त २ महिन्यात सबिरने २६७ किलो वजनाचं सोनं आखाती देशांमध्ये अवेध रितीने पाठवलं आहे किंवा इथं आणलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतील एका अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या माणसाने सबिरला चेन्नई विमानतळावर ही शोरुम उघडण्यासाठी ७० लाख रुपये दिले होते. फक्त एका सोन्याच्या अंगठीच्या तस्करीतून साबिरने ३ कोटींचं कमिशन मिळवलं होतं. (Fraudulent YouTuber)

सुरुवातीला या दुकानातील एका कर्मचाऱ्याला विमानतळावर पकडण्यात आलं. त्याच्याकडे १ किलो सोनं पावडरच्या स्वरुपात मिळालं होतं. पण, साबिर खानने जबाबदारी झटकली आणि तो कर्मचारीच त्यासाठी दोषी धरला गेला. हा एकमेव प्रसंग असावा असं तेव्हा आयात शुल्क विभागाला वाटलं. (Fraudulent YouTuber)

(हेही वाचा – खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत; विरोधकांच्या सभात्यागावर PM Modi यांचा हल्लाबोल)

इतकं सोनं पाठवलं देशाबाहेर 

पण, तपास अधिकाऱ्यांनी फोन कॉल ट्रेस करायला सुरुवात केली आणि त्यातून अत्याधुनिक प्रकारे सुरू असलेलं हे तस्करीचं रॅकेट उघड झालं. सबिरने ही शोरुम विमानतळ प्राधिकरणाच्या एका थर्ड पार्टी कंपनीकडून शोरुमची जागा भाड्याने घेतली. विमानतळावर दुकान असल्यामुळे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी या विभागाकडून मिळालेल्या ओळखपत्रांचा त्यांनी गैरफायदा घेतला. सुरक्षा यंत्रणेतून त्यांना काही वेळा सूट मिळाली. (Fraudulent YouTuber)

शिवाय हे कर्मचारी सोन्याची पावडर करून ती गुदाशयातून हे कर्मचारी ठरलेल्या प्रवाशांना नेऊन देत होते. ‘दुकानाच्या कर्मचाऱ्यांना सोन्याची पावडर बनवून ते शरीरात लपवण्याचं प्रशिक्षण मिळालेलं होतं. त्यामुळे हे कर्मचारी डिटेक्टरना फसवत होते. हे काम खूपच सफाईने चाललं होतं. दोनच महिन्यात १६७ किलो वजनाचं सोनं या लोकांनी देशाबाहेर पाठवलं,’ अशी माहिती आयात शुल्क विभागाने मीडियाला दिली. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा यंत्रणेकडून ओळखपत्र कुणी दिली याचाही तपास आता होत आहे. (Fraudulent YouTuber)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.