Sajid Mir : २६/११ हल्ल्याचा आरोपी साजिद मीरवर विषप्रयोग झाल्याचा पाकचा आरोप

Sajid Mir : २६/११ हल्ल्याचा आरोपी साजिद मीरवर विषप्रयोग झाल्याचा पाकचा आरोप

175
Sajid Mir : २६/११ हल्ल्याचा आरोपी साजिद मीरवर विषप्रयोग झाल्याचा पाकचा आरोप
Sajid Mir : २६/११ हल्ल्याचा आरोपी साजिद मीरवर विषप्रयोग झाल्याचा पाकचा आरोप

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतील संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी अन्य एका हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप पाकने केला आहे. साजीद मीर (Sajid Mir) याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असे पाकच्या माध्यमांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू)

जेवणातून विष दिल्याचा आरोप

साजिद मीर (Sajid Mir) हा २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (26/11 terror attack) कट रचणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर सध्या बहावलपूरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत. साजिद मीरवर विषप्रयोग झाल्यानंतर पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्याला तुरुंगातून थेट रुग्णालयापर्यंत एअरलिफ्ट केले.

साजिद मीरवरील (Sajid Mir) विषप्रयोगानंतर तुरुंगातल्या कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा एक खासगी स्वयंपाकी असून ऑक्टोबर २०२३ पासून तो तुरुंगातील कैद्यांसाठी जेवण बनवत आहे.

(हेही वाचा – Prashant Kishor : चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला कोणते दिले सल्ले?)

साजिद मीर हा २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी त्याला लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. साजिद मीर (Sajid Mir) हा अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. त्याच्यावर अमेरिकेने ५ मिलियन डॉलर्सचे (४१.६८ कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे. जून २०२२ मध्ये त्याला टेरर फंडिंगप्रकरणी (Terror Funding, दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याप्रकरणी) पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.

‘लष्कर’च्या माजी कमांडरची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) माजी कमांडर अकरम खान उर्फ अकरम गाझी याची गेल्या महिन्यात पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मुफ्ती कैसर फारूक, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीरसारख्या अनेक दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. (Sajid Mir)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.