Devendra Fadnvis : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा; पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची २३०० कोटींची मदत

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा देणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प समजला जात आहे.

160
Devendra Fadnvis : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा; पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची २३०० कोटींची मदत

गेल्या काही वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली भागात पावसाळयात नद्यांना मोठ्याप्रमाणावर पुराच्या पाण्यामुळे नुकसान होते. त्यामुळे या पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर व्यवस्थापन आणि दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प हातात घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागात मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.(Devendra Fadnvis )

अतिरिक्त पाणी नाईलाजास्तव कर्नाटकला द्यावे लागत होते 

मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलाजास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. त्यासाठी या भागातील नदीचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी काही प्रकल्प उभारणीस सुरुवातही झाली. मात्र अपुऱ्या निधीमुळे प्रकल्प अडकलेले असतानाच आता हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जागतिक बँकेकडून २३०० कोटी रूपयांची आर्थिक मदत घेण्यात येणार आहे. (Devendra Fadnvis )

(हेही वाचा :Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामी इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार)

जागतिक संस्थांचाही यात समावेश
अनेक जागतिक संस्थांच्या गाठिशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठिशी असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती. त्यातून महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगाने सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता. एकिकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे सुद्धा यातून शक्य होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.