DRDO: चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्हीची उड्डाण चाचणी यशस्वी

युएव्ही डीआरडीओच्या विमान विकास आस्थापनाकडून ही चाचणी विकसित करण्यात आली.

197
DRDO: चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्हीची उड्डाण चाचणी यशस्वी
DRDO: चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्हीची उड्डाण चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (DRDO) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील विमान चाचणी केंद्रातून स्वदेशी हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्हीची स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी झाली. या विमानाचे पहिले उड्डाण प्रात्यक्षिक जुलै २०२२ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर मूळ नमुने वापरून विविध विकासात्मक कॉन्फिगरेशनमध्ये ६ उड्डाण चाचण्या करण्यात आल्या.

हे युएव्ही डीआरडीओच्या विमान विकास आस्थापनाकडून ही चाचणी विकसित करण्यात आली. या उड्डाण चाचण्यांमुळे मजबूत वायुगतीय, नियंत्रण प्रणाली, एकात्मिक रियल टाइम आणि हार्डवेअर इन लूप सिम्युलेशन आणि अत्याधुनिक ग्राउंड कंट्रोल स्टेसन विकसित करण्यात यश आहे.

(हेही वाचा – Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला का केले आपलेसे? वाचा सविस्तर…)

संरक्षम मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रणालीच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राची प्रशंसा केली आहे. अशा महत्त्वाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा यशस्वी विकास सशस्त्र दलांना आणखी बळकट करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अनोखे प्रात्यक्षिक…
अंतिम कॉन्फिगरेशनमधील यशस्वी सातव्या उड्डाणाकरिता विमान इलेक्ट्रॉनिक्स (एव्हीओनिक) प्रणाली, एकीकरण आणि उड्डाण परिचालन कार्यान्वित केले होते. या हाय स्पीड युएव्हीने स्वायत्त लँडिंग, ग्राउंड रडार, पायाभूत सुविधा, वैमानिकाशिवाय सर्वेक्षण केलेल्या निर्देशांकासह कोणत्याही धावपट्टीवरून उड्डाणाची क्षमता, असे अनोखे प्रात्यक्षिक यावेळी करून दाखवले.

जीपीएस दिशादर्शकाची अचूकता राखण्यासाठी…
जीपीएस दिशादर्शकाची अचूकता राखण्यासाठी जीपीएसआधारित जीईओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन (GAGAN) रिसीव्हर्स वापरून स्वदेशी उपग्रह-आधारित ऑगमेंटेशनसह ऑनबोर्ड सेन्सर डेटा फ्यूजन वापरून हे प्रात्यक्षिक करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.