Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

121

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

(हेही वाचा Devendra Fadnavis : राज्याची अर्थव्यवस्था जनतेला न्याय देणारी असेल; अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करा)

दिव्यांग सैनिकांशी संवाद

ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग सैनिकांशी राज्यपालांनी संवाद साधला. यावेळी माहेर महिला मंडळाच्यावतीने दिव्यांग सैनिकांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांनी घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.