BMC : महापालिकेच्या मुदतठेवी पाच महिन्यांत सुमारे २ हजार कोटींनी घटल्या

जून २०२३ रोजी महापालिकेच्या मुदतठेवीतील रक्कम ही ८६ हजार ४६७ कोटी रुपये एवढी होती, तर नोव्हेंबर २०२३च्या अखेर पर्यंत मुदतठेवीतील ही रक्कम ८४ हजार ६१५ कोटींवर आली आहे. त्यामुळे पाच महिन्यांमध्येच मुदतठेवींमधील सुमारे दोन हजार कोटींची रक्कम कमी झाल्याचे दिसून येत आहे.

1969
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

मुंबई महापालिकेच्या (BMC) मुदतठेवीची गंगाजळी कमी होत असल्याबाबत आरोप तसेच टीका होत असतानाच आणखी दोन हजार कोटी रुपये ठेवीतून कमी झाल्या आहेत. जून २०२३ रोजी महापालिकेच्या मुदतठेवीतील रक्कम ही ८६ हजार ४६७ कोटी रुपये एवढी होती, तर नोव्हेंबर २०२३च्या अखेर पर्यंत मुदतठेवीतील ही रक्कम ८४ हजार ६१५ कोटींवर आली आहे. त्यामुळे पाच महिन्यांमध्येच मुदतठेवींमधील सुमारे दोन हजार कोटींची रक्कम कमी झाल्याचे दिसून येत आहे. (BMC)

मुंबईत मार्च २०२२ पासून प्रशासक नियुक्त असून सध्या राज्य शासनाच्या (State Govt) अधिपत्याखाली प्रशासक महापालिकेचे कामकाज करत आहे. ३१ मार्च २०२२ रोजी महापालिकेच्या मुदत ठेवींची रक्कम ही ९१ हजार ६९० कोटी रुपये एवढी होती. परंतु ३० जून २०२३ रोजी या मुदतठेवींमधील रक्कम ८६ हजार ४६७ कोटींवर पोहोचली होती. त्यामुळे महापालिकेच्या या मुदतठेवी खर्च केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून प्रशासक आणि राज्य सरकारवर केला जात आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे (UBT Group) नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून याचा जाब विचारला होता तसेच महापालिकेच्या घोटाळ्यांची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला होता.यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे स्पष्टीकरण देत ते आरोप खोडून काढले होते. (BMC)

(हेही वाचा – Muslim : नया नगरमध्ये सोमवारी धर्मांध मुसलमानांचा उन्माद; मंगळवारी पालिकेने फिरवला ‘बुलडोझर’)

इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे 

मात्र, आता महापालिकेच्यावतीने मुदतठेवींचा गोषवारा जाहीर झाला आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंतचा या बँकेतील मुदतठेवींच्या ताळेबंदमध्ये महापालिकेच्या नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण ८४ हजार ६१५ कोटी रुपयांचा निधी असल्याचे नमुद केले आहे. महापालिका प्रशासनाने नमुद केल्यानुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये अर्थसंकल्प अ, ई आणि ग या बाबतीतील मुदतठेवीतील आरंभीची एकूण गुंतवणूक ८५ हजार ३७० कोटी एवढी होती. त्यापैकी ७ हजार ४८९ कोटी रकमेच्या मुदतठेवी मॅच्युरड झाल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प अ, ई आणि ग ची नोव्हेंबर २०२३ मध्ये गुंतविण्यात आलेल्या एकूण रक्कम ६ हजार ७३४ कोटी वजा मॅच्युरड मुदतठेवी ७ हजार ४८९ कोटी या प्रमाणे नोव्हेंबर २०२३ मधील निव्वळ गुंतवणूक ७५५.०३ कोटी एवढी आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबर २०२३ रोजीची मुदत ठेवीतील अखेरची गुंतवणूक ८४ हजार ६१५ कोटी असल्याचे म्हटले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये ६ हजार ७३४ कोटी गुंतवणूक करण्यात आली आहे. ३६६ ते ५५८ दिवसांकरीता विविध बँकामध्ये गुंतवणूक केली असून त्यावर ७. ६० ते ७. ६८ टक्के दराने ५७८ कोटी रुपये व्याज नोव्हेंबर २०२३ मधील गुंतवणूक करण्यात आलेली आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या (BMC) या मुदतठेवी ८ मे २०२० रोजी ७९ हजार ११५ कोटी रुपये एवढी होती. तर दोन वर्षांमध्ये ही संख्या ९१ हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती. महापालिका प्रशासनाच्यावतीने शासन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), बेस्ट उपक्रमातील दिलेली तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम तसेच विविध विकास प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आल्याने त्यांचे अधिदान करण्यात येत असल्याने मुदतठेवीतील रक्कम कमी होत आहे, शिवाय अनेक प्रकल्प पूर्ण होत असल्याने कंत्राटदारांची अनामत रक्कम परत द्यावी लागत असल्याने तसेच व्याज दर कमी झाल्याने मुदतठेवीतील रकमते घट तथा कपात होत असल्याचे दिसून येत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.