Fire Prevention Measures : टोलेजंगी इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे धोरण, पण छोट्या इमारतींचे काय?

मुंबईमध्ये  निर्माण झालेल्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटन घडल्या तरी प्रत्यक्षात अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणा या तोकड्या पडत आहेत

123
Fire Prevention Measures : टोलेजंगी इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे धोरण, पण छोट्या इमारतींचे काय?
Fire Prevention Measures : टोलेजंगी इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे धोरण, पण छोट्या इमारतींचे काय?

मुंबईतील टोलेजंग इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुघर्टना टाळण्यासाठी तसेच त्याठिकाणी प्रतिबंधात्मक (Fire Prevention Measures) उपाययोजना राखण्यासाठी धोरण असले तरी प्रत्यक्षात सात मजल्यापर्यंतच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धोरण नाही. त्यामुळे अनेक सात मजल्यांपेक्षा कमी मजल्यांच्या इमारती मध्ये पार्किंगच्या जागेसह इमारतीचा व्हरांडा आणि जिन्यांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे आगीसारखी दुघर्टना घडल्यास नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असून आता या सात मजल्यांपेक्षा कमी उंचीच्या इमारतींबाबतही नवीन धोरण बनवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

मुंबईत मागील काही महिन्यांपासून आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढ होऊ लागली असून यामध्ये टोलेजंग इमारतींमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे टोलेजंग इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणा राबवून त्यांची कडक उपाययोजना आखण्याची जबाबदारी संबंधित इमारतींवर सोपवली जात असली तरी प्रत्यक्षा सात मजल्यापर्यंतच्या इमारतींमध्ये अशाप्रकारची उपाययोजना राबवली जात नाही.

टोलेजंग इमारतींमध्ये स्प्रिंकर्ससह प्रत्येक सहा मजल्यानंतर एक मजला रिकामी ठेवण्याची तरतूद असते. त्यामुळे टोलेजंग इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा योग्यप्रकारे राखण्याची काळजी घेतली जात आहे. टोलेजंग इमारतींमध्ये आगीच्या दुघर्टना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवल्या जात असल्या तरीही प्रत्यक्षात इतर इमारतींच्या अग्नि सुरक्षेबाबतचे स्पष्ट धोरण नसल्याने सात मजल्यांपर्यंतच्या इमारतींमध्ये विशेष लक्ष दिले जात नाही.

(हेही वाचा-2000 Rupees Notes : २००० ची नोट सुटी करा शेवटची संधी….)

ज्याप्रकारे टोलेजंग इमारतींसह मॉल्स, रुग्णालये, प्रसुतीगृह आदींचे फायर ऑडीट  केले जात असले तरी सात मजल्यापर्यंतच्या इमारतींचे ऑडीट होत नसल्याने अशाप्रकारच्या छोट्या इमारतींच्या फायर ऑडीटकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने आजवर या इमारतींकडे लक्ष दिले नसून गोरेगावमधील जयभारत को ऑप.सोसायटी या  एसआरएची पुनर्वसन इमारतींच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीमध्ये सात जणांचा मृत्यू होऊन, ६२ जण जखमी झाले. या आग दुघर्टनेनंतर आता मुंबईतील अशा छोट्या इमारतींसाठीही आग प्रतिबंधक (Fire Prevention Measures) उपाययोजना संदर्भात नवीन धोरण बनवण्याची वेळ महापलिकेवर आली आहे.

मुंबईमध्ये  निर्माण झालेल्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या घटन घडल्या तरी प्रत्यक्षात अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणा या तोकड्या पडत आहेत. त्यामुळे उत्तुंग इमारतींच्या अग्नि सुरक्षेची जबाबदारी संबंधित इमारतींवर टाकण्यात येत असते. परंतु सात मजल्यापर्यंतच्या इमारतींमधील प्रत्येक रहिवाशांनीही आगीची दुघर्टना होऊ नये याची काळजी घेऊन इमारतीच्या व्हरांड्यासह जिन्यांमध्ये कोणतीही अडगळ निर्माण करू नये.

जिन्या खाली तसेच वाहनतळाच्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचे सामान ठेवून जागा अडवून ठेवू नये अशाप्रकारची स्वयंशिस्त असायला हवी. परंतु ही  शिस्त प्रत्येक इमारतींमधील रहिवाशांनी बाळगायला हवी. यासाठी स्वतंत्र धोरण नसले तरी इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांचे हे कर्तव्य आहे. मात्र, आता या घटनेनंतर छोट्या इमारतींच्या आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठीही तसेच त्यांचे फायर ऑडीट बंधनकारक करण्याच्या दृष्टीकोनातून धोरण बनवण्याची वेळ आली असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.