कोरोनाच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढणार?

104

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेचे संकट अधिक होते. या आधारावर कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका तुलनेने अधिक वाढणार आहे, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटना(WHO) व भारत सरकारच्या आरोग्य विभागातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात दुस-या लाटेवेळी सर्वाधिक रुग्ण केव्हा होते याची नोंद घेऊन संभाव्य तिस-या लाटेवेळी दीडपट अधिक रुग्ण आढळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात ऑक्टोबरमध्ये तिस-या लाटेचा धोका तीव्र होईल, असे नमूद करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांना अधिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचाः पाच जंबो कोविड सेंटरचा तीन महिन्यांचा व्यवस्थापन खर्च १०० कोटी)

तिस-या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज

कोरोनाच्या तिस-या लाटेचा जास्त धोका लहान मुलांना असल्यामुळे, राज्य सरकारने लहान मुलांसाठी कोविड रुग्णालयांमध्ये पाच टक्के खाटा, आरोग्य केंद्रात दहा टक्के खाटा, कोविड निगा केंद्रात १५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतील असे स्पष्ट केले. या लाटेत एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण घरगुती विलगीकरणात असतील, तर ३५ टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील १७.५ टक्के रुग्ण अनुक्रमे खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेतील, असे सांगण्यात येत आहे.

तज्ज्ञांमध्ये संभ्रम

तिस-या लाटेबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता असून, तिसरी लाट येईल की नाही याबाबत साशंकता आहे. तरीही तिस-या लाटेत अधिक रुग्ण असतील असे गृहीत धरुन राज्य सरकार योग्य उपाययोजना करत आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः नवरात्रोत्सवापूर्वीच कोविडबाधित रुग्णांचा आकडा सहाशेपार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.