Exam Scam: NEET पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

110
Exam Scam: NEET पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!
Exam Scam: NEET पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

नीट प्रकरणात अटकेत असलेला जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण (ZP School Principal JalilKhan UmarKhan Pathan) (रा. लातूर) यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.  (Exam Scam)

(हेही वाचा – Congress च्या खासदाराने घेतली ‘मृत’ भाषेत शपथ)

दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव याची मन:स्थिती चांगली नसून, जिवाचे बरेवाईट करण्याची कृती दिसून आली. त्याच स्थितीत पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. अजून तरी दप्तरी अटकेची कारवाई नाही. नीटमध्ये (NEET Exam Scam) गुणवाढ करून देण्याच्या व्यवहारात दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा कृष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजारांत बोलणी व्हायची. पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक असलेला आरोपी पठाण कोठडीत असून, दुसरा शिक्षक संजय तुकाराम जाधव (Teacher Sanjay Tukaram Jadhav) (मूळ रा. लातूर, नोकरी सोलापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तिसरा आरोपी इरण्णा याच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. (Exam Scam)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.