BMC : प्रकल्प बधितांसाठी पीएपी मॅनेजमेंट युनिटची स्थापना

मासिक ३५ हजार वेतनावर त्या पदावर कंत्राटी सहायक समाज विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. एक वरधानच्या9 कालावधी साठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

104
मुबई महानगरपालिकेच्या  मालमत्ता खात्याच्यावतीने पीएपी मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली असून सहाय्यक समाज विकास अधिकारी हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहे. हे समाज विकास अधिकारी प्रकल्प बाधित कुटुंबांना दिलेल्या सदनिकांच्या इमारतीत गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.  त्यामुळे प्रकल्प बधितांच्या इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीचा भार जो महापालिकेच्या डोक्यावर पडतो तो या प्रकल्प बधितांच्या गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यास तो भार कमी होईल.
महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात बाधित होणाऱ्या पात्र कुटुंबाचे पुनर्वसन हे प्रकल्प बधितांच्या इमारतीत करण्यात येते. आज अनेक प्रकल्प बधितांच्या इमारती असून या इमारतीतील बाधित कुटुंबाच्या गृह निर्माण संस्था न झाल्याने महानगरपालिकेस पाणी, वीज बिल आणि मालमत्ता करापोटी आर्थिक भार सहन करावा लागतो.जबाबदारीतून महानगरपालिकेची मुक्तता होईल. या उद्देशांकरिता पीएपी मॅनेजमेंट युनिटची (PAP Management Unit) ची स्थापना करण्यात आली आहे. पण हे कामकाज गुंतागुंतीचे असून त्याचा आवाका फार मोठा आहे.  त्यामुळे हे काम तातडीचे असल्याने तसेच महानगरपालिका कर्मचारीवृंद अपुरा पडत असल्याने, शासन निर्णयाच्या धर्तीवर या कामासाठी सेवा निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनमधून एक समाज विकास अधिकारी व दोन सहायक समाज विकास अधिकारी यांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एका सहायक समाज विकास अधिकारी यांचे पद भरण्यात आले आहे. मासिक ३५ हजार वेतनावर त्या पदावर कंत्राटी सहायक समाज विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. एक वरधानच्या9 कालावधी साठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 प्रकल्पबाधित व्यक्तींना देण्यात येणा-या इमारतींची एक वेळ दुरुस्ती करुन इमारतींमधील सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, सदनिकाधारकांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन त्या संस्था नोंदणीकृत करणे व संस्थेस इमारत हस्तांतरित करणे, इ. कामकाज केले जाते.हे काम आता या युनिट अंतर्गत केले जाईल.  जेणेकरुन  महानगरपालिकेस पाणी, वीज बिल आणि मालमत्ता करापोटी सोसावा लागणारा आर्थिक भार कमी होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.