‘पंचमहाभूते’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) यांच्या वतीने फळझाडं वितरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. (Environment Day) दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे १५ जून या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत सोसायटी किंवा संस्था यांच्यासाठी प्रत्येकी ५ फळझाडांचे वाटप करण्यात येणार आहे.
फळझाडे घेण्यासाठी https://forms.gle/GszuAWa4DnvehocM8 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
निसर्गरक्षणासाठी कार्य करणारी संस्था पंचमहाभूते
मुंबईतील (Mumbai) झाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. जागतिक तापमानवाढीचा परिणाम आताच इतक्या तीव्रतेने दिसून येत आहे, तर येणाऱ्या पिढ्यांना तो किती भोगावा लागू शकतो, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळेच मुंबईतील निसर्गाचे संगोपन व्हावे, यासाठी अमित सावंत यांची पंचमहाभूते ही संस्था वर्ष २०२१ पासून काम करत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत विविध उपक्रम राबण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या औचित्याने हे फळझाडे वितरण करण्यात येणार आहे. (Environment Day)
“पंचमहाभूते फाउंडेशन” ही एनजीओ या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “नो बाथ डे”, “टू मिनिट शॉवर”, “पर्यावरण विघ्नहर्ता” आणि “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना एनजीओ सातत्याने राबवत आहे. “सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी करुन घेणे, हा फाउंडेशनचा आग्रह असतो. अत्यंत सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकही सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवू शकतील, असा फाऊंडेशनचा प्रयत्न असतो.
पंचमहाभूते फाउंडेशन लोकांची नाळ ओळखून समाजविधायक कामे हाती घेते आणि म्हणूनच अशा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना जनतेचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ते निसर्गाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन यासाठीही कटिबद्ध होतील. समजून उमजून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देऊ करतील, असा पंचमहाभूते फाउंडेशनचा ठाम विश्वास आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community