Mazgaon Tadwadi ताडवाडीतील त्या कुटुंबांची नरकयातना संपवा, पुनर्विकास होईपर्यंत माझगावमध्ये पर्यायी पुनर्वसन करा

Mazgaon Tadwadi : उबाठा शिवसेनेचे जामसुतकर यांची आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना विनंती

1505
Mazgaon Tadwadi ताडवाडीतील त्या कुटुंबांची नरकयातना संपवा, पुनर्विकास होईपर्यंत माझगावमध्ये पर्यायी पुनर्वसन करा
Mazgaon Tadwadi ताडवाडीतील त्या कुटुंबांची नरकयातना संपवा, पुनर्विकास होईपर्यंत माझगावमध्ये पर्यायी पुनर्वसन करा

माझगाव ताडवाडीतील (Mazgaon Tadwadi) बीआयटी चाळींचा पुनर्विकास रखडलेला असून पुनर्विकासाच्या नावाखाली येथील चार इमारती पाडून त्यातील सुमारे २२० कुटुंबांना माहुल येथील महापालिकेच्या (Municipal Commissioner) संक्रमण शिबिरांत तात्पुरते पुनर्वसन केले. परंतु मागील अनेक वर्षांपासून ही कुटुंबे माहुलच्या संक्रमण शिबिरांत राहत आहे.  पण आता नवीन विकासक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून हा प्रकल्प पुढील ७ वर्षांमध्ये पूर्ण होईल असे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे अजुन सात वर्षे त्यांना माहुलमधील जागेत नरक यातना सहन कराव्या लागणार असून यासर्व कुटुबांना आता माझगावच्या आसपासच्या परिसरात पुनर्विकास होईपर्यंत तात्पुरते पुनर्वसन करावे अशी मागणी माजी नगरसेवक आणि उबाठा शिवसेनेचे विभागप्रमुख मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) यांच्याकडून केली जात आहे.  यासंदर्भात त्यांनी  १३ मार्च २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) आणि तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल निवेदनही दिली आहेत. (Mazgaon Tadwadi)

(हेही वाचा- Moscow Terrorist attack : हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी)

 रासायनिक कंपन्यांनी वेढलेला परिसर

माझगाव ताडवाडीच्या (Mazgaon Tadwadi) पुनर्विकाला सुरुवात करताना तत्कालिन विकासकाने येथील बि.आय.टी. चाळ क्र. १४, १५ व १६ या इमारती पाडून त्यातील १८० कुटुंबांना त्याच ठिकाणी संक्रमण शिबिर बांधून पुनवर्सन केले आणि उर्वरीत २२० भाडेकरूंना पोलिस बळाचा वापर करून माहुल येथील संक्रमण शिबिर इमारत क्रमांक ४ ए  व ४ बी मध्ये तात्पुरते पुनर्वसन केले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून ही कुटुंबे माहुलमधील त्या संक्रमण शिबिरात राहत असून हा विभाग रासायनिक कंपन्यानी वेढलेला आहे. हा संपुर्ण परिसर प्रदुषित आहे. माहुलमधील या प्रदुषणांमुळे नागरीकांच्या अंगावर च‌ट्टे येणे, केस गळणे, जेष्ठ नागरीक व लहान मुलांना श्वसनाचे त्रास होणे अशा अनेक अनेक समस्यांनी ते ग्रासलेले आहे त्यामुळे एकप्रकारे आमच्या माझगाव ताडवाडीतील रहिवाशी माहुलच्या या ठिकाणी गेले आठ वर्ष नरकयातना भोगत असल्याचे मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) यांनी आपल्या या निवेदनात स्पष्ट केले. (Mazgaon Tadwadi)

 रहिवाशांना  ६०० चौरस फुटापेक्षा मोठे घर

माझगाव ताडवाडीचा पुनर्विकासाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होता. सर्वोच्च न्यायालयाने निवड केलेल्या विकासकाला हटवून महानगरपालिकेला (Municipal Commissioner) स्वतंत्र निविदा काढून विकासक नेमणूक करण्याचे आदेश  दिले. त्यानुसार सध्या एका विकासकाची माझगाव ताडवाडीच्या पुर्नविकासाकरीता निवड करण्यात आली. हा पुनर्विकास ३३ (९) पुर्नविकास अंतर्गत होत आहे. ३३ (९) पुर्नविकासामध्ये रहिवाशांना जास्तीत जास्त चटईक्षेत्राचे सदनिका शासनाच्या धोरणानुसार रहिवाशांना विना मोबदला मिळते. (Mazgaon Tadwadi)

(हेही वाचा- IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूडचं फ्युजन )

या पुनर्विकासामध्ये भाडेकरूंना ३५ टक्के फंजीबल सह किमान ६०० चौ. फुट चटई क्षेत्राची सदनिका मिळावी तसेच त्यांच्या देखभालीचा खर्च व संक्रमण भाडे अथवा संक्रमण शिबीर रहिवाशांसोबत चर्चा करुन ठरवावे. (Mazgaon Tadwadi)

 अजुन सात वर्षांचा कालावधी पुनर्विकासाला

तसेच  माहुल येथील आमचे सहकारी भाडेकरु हे आठ वर्षापासुन खितपत पडले असून  आता हा पुनर्विकासाचा कालावधी ७ वर्षाचा  असेल. त्यामुळे अजुन ७ वर्ष आमचे रहिवाशी माहुल येथे नरकयातना भोगत राहणार आहेत. म्हणून या माहुल येथील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या २२० भाडेकरूंना माझगाव येथेच किंवा माझगाव विभागातील २ कि.मी.च्या परिघात लवकरात लवकर संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करावे अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली. (Mazgaon Tadwadi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.