Elon Musk vs Mark Zuckerberg : मस्क यांनी पुन्हा दिलं झुकरबर्ग यांना आव्हान

‘मी तुझ्याशी कुठेही आणि कधीही लढायला तयार आहे,’ असं मस्क ट्विटर संदेशात म्हणाले आहेत. 

93
Elon Musk vs Mark Zuckerberg : मस्क यांनी पुन्हा दिलं झुकरबर्ग यांना आव्हान
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन उद्योग जगताला आणि सोशल मीडियालाही हे युद्ध तसं नवीन नाहीए. अख्खं २०२३ चं वर्षं यावर अखंड चर्चा झाली आहे. टेस्लाचे सर्वेसर्वा आणि तेव्हा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क (Elon Musk) आणि मेटा ही टेक कंपनी चालवणारे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्यात पिंजऱ्यातील लढत होणार आहे. आणि ही लढत एक्स तसंच मेटा या व्यासपीठांवर लाईव्ह दाखवली जाणार आहे, असं तेव्हा सगळीकडे पसरलं होतं. मस्क आणि झुकरबर्ग अनुक्रमे ट्विटर आणि थ्रेडवर सोशल मीडियाला चेतवणारे संदेशही लिहित होते. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

अखेर तो धुराळा शांत झाला झुकरबर्ग यांनी लिहिलेल्या एका थ्रेडने. ‘मला खरंच आव्हान द्यायचं असेल तर माझ्याशी कसा संपर्क करायचा हे मस्क (Elon Musk) यांना ठाऊक आहे. नाहीतर मला वाटतं, हे आव्हान विसरून पुढे गेलेलंच बरं!’ त्यांच्या या संदेशानंतर पुढे काहीच घडलं नाही. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

या आघाडीवर शांतता असताना आता मस्क यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर डरकाळी फोडली आहे. ‘झुक! मी तुला कुठेही आणि कधीही भिडायला तयार आहे. कुठलेही नियम असू देत,’ असं मस्क यांनी म्हटलं आहे. याला झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी अजून तरी उत्तर दिलेलं नाही. पण, ट्विटरच्या ग्राहकांचं यातून चांगलंच मनोरंजन होत आहे. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

मस्क यांनी वेळोवेळी ट्विटरच्या माध्यमातून झुकरबर्ग यांना दिले होते आव्हान 

एका व्यक्तीने मस्कला (Elon Musk) उत्तर देताना म्हटलंय, ‘इटलीत कोलोसियम इमारतीत ही लढत व्हावी. आणि त्याची तिकिटं डिजीकॉईनमध्ये असावीत.’ ही व्यक्ती डिजिकॉईनची चाहती आहे हे उघडच आहे. तर आणखी एकाने अशा लढती आधीच झुकरबर्गला विजेता ठरवलं आहे. ‘झुकरबर्ग आधीच जिंकलेला आहे, मस्क. टेस्लाचे शेअर बघ आणि मेटाचे बघ.,’ असं या व्यक्तीने मस्कला सुनावलं आहे. ‘अशी लढत घडवून आणून लोकांना फक्त त्याची मजा घ्यायची आहे,’ असंही एकाने म्हटलं आहे. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्यात २०२३ मध्ये सार्वजनिक वाक्‌युद्ध रंगलं होतं. मेटा कंपनीने सुरू केलेल्या थ्रेड सेवेला तेव्हा सुरुवातीला चांगलं यश मिळालं होतं. आणि ही सेवा ट्विटरला आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेव्हा मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून झुकरबर्ग यांना वेळोवेळी आव्हान दिलं होतं. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

अलीकडे म्हणजे २०२४ च्या सुरुवातीपासून मस्क गुगल कंपनीला कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित जेमिनी प्रोग्रामवरून असंच जाहीरपणे आव्हान देत आहेत. ते स्वत: असा प्रोग्राम विकसित करण्यावर काम करत आहेत. तसंच त्यांना जीमेल सारखीच एक्समेल ही ईमेल सेवाही तयार करायची आहे, असं बोललं जातंय. आता पुन्हा एकदा त्यांनी झुकरबर्ग यांना ललकारलं आहे. (Elon Musk vs Mark Zuckerberg)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.