Mumbai Local: अंधेरीतील गोखले पूल उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘या’ लोकल रद्द

124
Mumbai Local: अंधेरीतील गोखले पूल उड्डाणपुलाच्या कामासाठी 'या' लोकल रद्द
Mumbai Local: अंधेरीतील गोखले पूल उड्डाणपुलाच्या कामासाठी 'या' लोकल रद्द

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे (Mumbai Local) उड्डाणपुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री १.१० ते सोमवारी पहाटे ४.४० पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या ८ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.

अप-डाऊन हार्बरसह अप-डाऊन धीमा-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी, १७ डिसेंबरला रद्द होणाऱ्या फेऱ्या पुढिलप्रमाणे आहेत.

(हेही वाचा –Force Gurkha 5 Door : फोर्सची फाईव्ह डोअर गुरखा एसयुव्ही मारुती जिमनीशी टक्कर द्यायला तयार )

रविवारी रद्द होणाऱ्या फेऱ्या
– विरार-अंधरी : रात्री १०.१८
– वसई रोड-अंधेरी : रात्री ११.१५
-चर्चगेट-विलेपार्ले : मध्यरात्री १२.३०

सोमवारी ‘या’ फेऱ्या रद्द
– अंधेरी-विरार : पहाटे ४.२५
– वांद्रे-बोरिवली : पहाटे ४.०५
– बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.५३
– अंधेरी-विरार : पहाटे ४.४०
– अंधेरी-चर्चगेट : पहाटे ४.०५

या लोकलना सोमवारी विलंब
– विरार-चर्चगेट : पहाटे ३.२५ (१० मिनिटे)
– बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)
– विरार-बोरिवली : पहाटे ३.३५ (१० मिनिटे)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.