Economy Of The Country: देशाची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ६.६ टक्के दरानं वाढेल, जागतिक बँकेचा अंदाज

86
Economy Of The Country: देशाची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ६.६ टक्के दरानं वाढेल, जागतिक बँकेचा अंदाज

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था (Economy Of The Country) ६.६ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा अंदाज जागतिक बँकेच्या मागील अंदाजापेक्षा किंचित अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विकास दर मंदावणार असून ६.६% पर्यंत होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतरच्या वर्षांत त्यात तेजी दिसून येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलंय. जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष २०२४ चा विकास दर ७.५ टक्के व्यक्त केला आहे, हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं वर्तवलेल्या ७.६ टक्क्यांपेक्षा थोडा कमी आहे.

(हेही वाचा – Clean up Marshall : क्लीन अप मार्शल वसूल करणार डिजीटल पद्धतीने  दंड)

अर्थव्यवस्थेचे घटक…
जागतिक बँकेनं म्हटलंय की भारतातील सेवा आणि उद्योग क्षेत्रातील वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. बांधकाम आणि रिअल इस्टेटद्वारे यात मदत मिळेल, तर महागाईचा दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या काळात भारताच्या विकासाची गती सार्वजनिक क्षेत्रावर अवलंबून असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार, वाढलेलं कर्ज, कर्ज घेण्याचा खर्च आणि वित्तीय तुटीला लगाम घालण्याचे प्रयत्न यामुळे वाढीवर परिणाम होऊ शकतो.

आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेत मंदीची भीती
जागतिक बँकेनं अहवालात म्हटलंय की, आशियाई अर्थव्यवस्थांचा विकास दर गेल्या वर्षीच्या ५.१ टक्क्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था या वर्षी म्हणावी तशी कामगिरी करत नाहीत. कर्ज, व्यापारातील समस्या आणि धोरणात्मक अनिश्चितता या क्षेत्रातील आर्थिक गती कमी करत आहे आणि कमकुवत सामाजिक सुरक्षा जाळे तसंच शिक्षणातील कमी गुंतवणूक यासारख्या दीर्घकालीन समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारांना त्यांचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. आशियाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या पूर्वीच्या तुलनेत अधिक धीम्या गतीनं वाढत आहे, परंतु जगाच्या अन्य भागांच्या तुलनेत ही अधिक असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.