Maharashtra Weather Forecast: ढगाळ वातावरणासह तापमानात घट; मुंबईत तुरळक पावसाची शक्यता

142
Maharashtra Weather Forecast: ढगाळ वातावरणासह तापमानात घट; मुंबईत तुरळक पावसाची शक्यता
Maharashtra Weather Forecast: ढगाळ वातावरणासह तापमानात घट; मुंबईत तुरळक पावसाची शक्यता

Jराज्यात सध्या हवामानात (Maharashtra Weather Forecast) बदल दिसून येत आहे. राज्यातील एकंदर हवामान प्रणाली पाहता पुढील तीन ते चार दिवसांसाठी हीच स्थिती कायम राहणार असून, राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) काही अंशी आकाश ढगाळ राहील, तर दुपारनंतर ते निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी शहराच्या किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटेल. तर, ठाणे, पालघर भागातही आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Weather Forecast)

सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात सध्या जेऊर येथे 43.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सध्या देश स्तरावर कर्नाटकच्या दक्षिण भागावर चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Forecast)

(हेही वाचा –Mihir Kote : मोदीजींचा विकास हवा की उबाठाची गुंडशाही, मिहिर कोटेचा यांचा सवाल)

विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागापासून तामनिळनाडूपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं निरीक्षणही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे. (Maharashtra Weather Forecast)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.