Indian Railways : ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण; मालवाहतुकीसह रेल्वे प्रवाशांना होणार ‘हा’ फायदा

22
Indian Railways : ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण; मालवाहतुकीसह रेल्वे प्रवाशांना होणार 'हा' फायदा
Indian Railways : ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण; मालवाहतुकीसह रेल्वे प्रवाशांना होणार 'हा' फायदा

भारतीय रेल्वेच्या DFC कॉरिडॉरचा ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (EDFC) आता पूर्णपणे तयार आहे. (Indian Railways) EDFC पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील सोननगरला जाते. देशातील या अतिशय खास कॉरिडॉरची लांबी 1337 किमी आहे. ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 51 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. देशातील मालवाहतुकीसाठी तयार होत असलेल्या या सर्वांत मोठ्या रेल्वे मार्गाचे म्हणजेच समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने पूर्ण होत आहे. भारतीय रेल्वेने उद्योगांना आश्वासन दिले होते की, याद्वारे त्यांचा माल एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज आणि वेगाने पोहोचू शकेल. हा प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे. (Indian Railways)

(हेही वाचा – Ind vs Pak : भारत – पाक सामन्यासाठी केलेली खेळपट्टी कशी आहे? सामना कुठे आणि कधी बघता येईल?)

हे आहेत ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे फायदे 
  • या उपक्रमामुळे वीजगृहांना कोळशाचा पुरवठा जलद होईल. EDFC दररोज 140 मालगाड्या चालवणार आहे, त्यापैकी 70 टक्के कोळशाच्या गाड्या आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या वीज प्रकल्पांना याचा फायदा होणार आहे.
  • रेल्वेच्या पश्चिम कॉरिडॉरचेही ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. ते या आर्थिक वर्षात ९५ टक्के पूर्ण होईल. भारतीय रेल्वेचा पश्चिम कॉरिडॉर खुर्जा ते जेएनपीटी मुंबईपर्यंत बांधला जात आहे.
  • मालगाड्या सामान्य ट्रॅकच्या दुप्पट वेगाने धावतील म्हणजेच सरासरी वेग ताशी 50 किलोमीटर वेगाने धावतील. सध्या रेल्वेतील मालगाड्यांचा सरासरी वेग ताशी २५ किलोमीटर आहे. एका तासात त्या केवळ २५ किलोमीटर धावू शकतात.
  • या कॉरिडॉरवर फक्त मालगाड्याच धावतील; परंतु प्रवासी गाड्यांनाही याचा फायदा होईल; कारण मालगाड्या सामान्य रेल्वे रुळांवरून चालवल्या जातील आणि रुळावरील ताण कमी झाल्यामुळे प्रवासी गाड्याही अधिक वेगाने धावतील. (Indian Railways)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.