Dr Jitendra Singh : भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था

डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्लीमधील टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ‘द बिग शिफ्ट – मेजरिंग द फोर्सेस ऑफ चेंज’ या जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करत होते.

167
Dr Jitendra Singh : भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था

आज भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आपण २०१४ मध्ये ८१ व्या क्रमांकावर होतो. आज आपण जगात ४० व्या क्रमांकावर आहोत. भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे आणि इथे सर्वांत वेगाने वाढणारे युनिकॉर्न आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह (Dr Jitendra Singh) म्हणाले.

(हेही वाचा – Dr. Neelam Gorhe : पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे)

भारताच्या स्टार्टअप्समध्ये ३०० पटीने वाढ –

डॉ जितेंद्र सिंह (Dr Jitendra Singh) नवी दिल्लीमधील टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ‘द बिग शिफ्ट – मेजरिंग द फोर्सेस ऑफ चेंज’ या जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करत होते. २०१४ मध्ये भारतात केवळ ३५० स्टार्टअप्स होते. आज त्यात ३०० पटीने वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया’ अशी घोषणा दिल्यानंतर आणि २०१६ मध्ये विशेष स्टार्टअप योजना आणल्यानंतर, आज आपल्याकडे १,३०,००० स्टार्टअप्स आहेत आणि ११० हून अधिक युनिकॉर्न आहेत,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – CM Yogi Adityanath : आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मोगलांशी नाही)

भारताचा हा प्रवास एक संशोधनाचा विषय आहे –

“नाजूक ५” ते “अव्वल ५” अर्थव्यवस्थेपर्यंतचा गेल्या दहा वर्षांचा भारताचा हा प्रवास एक संशोधनाचा विषय आहे, जो अर्थशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आकर्षित आणि उत्साही करेल. भूतकाळातील उपहासवृत्ती आणि घोटाळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील दशक ही निराशावादाकडून आशावादाकडे प्रवासाची सुरुवात आहे, असे ते पुढे म्हणाले. (Dr Jitendra Singh)

देशात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत भारताने विविध जागतिक मापदंड आणि सार्वत्रिक मानकांमध्ये वेगाने वाढ केली आहे. देशात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती, मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षम वातावरण तयार झाले, असे सिंह (Dr Jitendra Singh) म्हणाले.

(हेही वाचा – Swami Govind Dev Giri ji Maharaj : स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराजांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे भारताचे अंतराळ क्षेत्र खुले झाल्यामुळे, सामान्य जनतेला चांद्रयान-3 आणि आदित्य सारख्या प्रमुख अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होता आले. चार-पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे अंतराळ क्षेत्रात फक्त एक स्टार्टअप होता, आज हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे सुमारे 190 खाजगी स्पेस स्टार्टअप्स आहेत तर याआधीचे स्टार्टअप आता उद्योजक बनले आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत खाजगी स्पेस स्टार्टअप्सनी 1,000 कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे असे ते म्हणाले. (Dr Jitendra Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.