Raj Thackeray On Reservation : आरक्षणाच्या वादात पडू नका; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश

शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी 'येत्या काहीच दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू', असे सांगितले. त्याआधी लोकसभा निवडणूक (loksabha election 2024) येत आहे, त्या तयारीला लागा, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.

95
Raj Thackeray On Reservation : आरक्षणाच्या वादात पडू नका; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश
Raj Thackeray On Reservation : आरक्षणाच्या वादात पडू नका; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. (Raj Thackeray On Reservation) या बैठकीत सध्या घडणाऱ्या घटना आणि निवडणुका यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या सुरु असलेल्या ओबीसी-मराठा आरक्षणाचा (maratha reservation) वाद सुरु आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा अशी सूचना राज ठाकरेंनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.

(हेही वाचा – Mathura Corridor : आता श्रीकृष्णाच्या मथुरेतही कॉरिडॉर; उच्च न्यायालयाची अनुमती !)

मराठी पाट्यांसंदर्भातही सूचना

शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी ‘येत्या काहीच दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू’, असे सांगितले. त्याआधी लोकसभा निवडणूक (loksabha election 2024) येत आहे, त्या तयारीला लागा, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसोबतच २५ नोव्हेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना मुदत दिली आहे. ज्या दुकानदारांनी अजूनही पाट्या मराठीत करून घेतल्या नाहीत, त्यांना आठवण करुन द्या, असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. (Raj Thackeray On Reservation)

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अशा प्रकारे आरक्षण मिळणार असे मी बोललो होतो. परंतु आता जरांगे पाटील आहेत कि त्यांच्या मागे कोण आहे ? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असे आहे का ? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टा होत आहेत. हे सगळे चित्र सरळ नाही आहे. याच्यामागे कोण आहे, हे कालांतराने समोर येईल, असेही राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.