Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर; इंजिनिअरिंग कंपन्यांना प्राधान्य; कारण वाचा सविस्तर…

केमिकल कंपनीमधील कामगारांना बेरोजगार होऊन देणार नाही असे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

160
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर; इंजिनिअरिंग कंपन्यांना प्राधान्य; कारण वाचा सविस्तर...

डोंबिवली पूर्व एमआयडीसी (MIDC) येथे असणाऱ्या आमुदान या केमिकल कंपनीमध्ये गुरुवारी (२३ मे) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केमिकल रिऍक्टरच्या स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर करण्याचा आणि त्या ठिकाणी ‘इंजिनिअरिंग वर्क’ कंपन्या आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच येथील कामगारांना बेरोजगार होऊन देणार नाही असे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Dombivli MIDC Blast)

डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेज २ या ठिकाणी असलेल्या आमुदान या केमिकल प्लांटमध्ये गुरुवारी सकाळी केमिकल रिऍक्टरचा भीषण स्फोट होऊन आग लागली. या स्फोटात आजूबाजूला असलेल्या ६ केमिकल कंपन्यांचे मोठे नुकसान होऊन ५०० मीटर परिसरात या स्फोटाची तीव्रता जाणवली. अनेक घरांचे छत कोसळून घरातील वस्तूंचे नुकसान झाले, तसेच अनेक इमारतींची तावदाने तुटली. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना एम्स, ग्लोबल आणि नेपचून या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी स्फोट होऊन आग लागली त्याठिकाणी आणखी ८ ते १० जणांचे मृतदेह आढळण्याची शक्यता आहे. (Dombivli MIDC Blast)

(हेही वाचा – Naxalite Encounter : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांना केले ठार)

स्फोटाच्या घटनेनंतर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार राजू पाटील, राज्य औद्योगिक मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) येथील मागील काही वर्षांतील केमिकल कंपनीत स्फोट होण्याची दुसरी घटना आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून येथील केमिकल कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर करण्यात येईल व या ठिकाणी ‘इंजिनियरिंग वर्क्स’ कंपन्या आणण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, त्याच बरोबर येथील कामगारांना बेरोजगार होऊ दिले जाणार नाही. येथील कामगारांचे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्थलांतर करण्यात येईल, असे खासदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्याचे औद्योगिक मंत्री उदय सामंत यांनीदेखील पत्रकरांशी बोलताना लवकरच येथील केमिकल कंपन्या शहराबाहेर घेऊन जाण्याच्या निर्णय सरकार घेईल असे म्हटले आहे. (Dombivli MIDC Blast)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.