तुमच्या घराच्या आसपास कचरा साचलेला दिसतो का? महापालिकेने तो उचलला नाही का? मग विचार कसला करता ‘या’ क्रमांकावर पाठवा फोटो

279
तुमच्या घराच्या आसपास कचरा साचलेला दिसतो का? महापालिकेने तो उचलला नाही का? मग विचार कसला करता 'या' क्रमांकावर पाठवा फोटो
तुमच्या घराच्या आसपास कचरा साचलेला दिसतो का? महापालिकेने तो उचलला नाही का? मग विचार कसला करता 'या' क्रमांकावर पाठवा फोटो

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे कचऱ्या संदर्भातील तक्रारींच्या निर्मुलनाकरीता एक थेट व्यासपीठ या क्रमांकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार ५ जून २०२३ पासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, मुंबई महानगरात घन कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांसाठी थेट संपर्क सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाने, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याने ही नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२३ पासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

घन कचर्‍याची तक्रार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ

मुंबईतील कचरा विषयक नागरिकांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेमार्फत ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना “कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे” या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता / जीपीएस लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – महापालिका प्रशासन म्हणतंय, मुंबई शहरातील ‘या’ भागांत तुंबणार नाही पाणी!)

ही तक्रार ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती तक्रार संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. सध्या तक्रार निर्मुलनाकरीता लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.

त्यामुळे मुंबईकरांनी कचरा अथवा अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे छायाचित्र सदर व्हॉट्सॲप चॅटबॉट ८१६९६८१६९७ क्रमांकवर पाठवावेत. तक्रारींचे निर्मूलन करण्याकरीता उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा, मुंबई महानगर सदैव स्वच्छ राखण्याकरिता आपला सहभाग द्यावा, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.