ICC: वीरेंद्र सेहवागला आयसीसीकडून दिवाळी गिफ्ट, ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

69
ICC: वीरेंद्र सेहवागला आयसीसीकडून दिवाळी गिफ्ट, 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश
ICC: वीरेंद्र सेहवागला आयसीसीकडून दिवाळी गिफ्ट, 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याची गणना क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वात आक्रमक सलामीवीर म्हणून होते. त्याने खेळलेल्या अनेक अविस्मरणीय खेळींची आजही आठवण काढली जाते, कारण आज टी-२० फलंदाजीची संख्या वाढत असली तरी वीरेंद्रने त्याच्या कारकिर्दित एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटच्या जगतात आक्रमकता दाखवली आहे, त्याला तोड नाही. देशभरात उत्साहात दिवाळी साजरी होत असतानाच वीरेंद्र सेहवागला दिवाळीचं खास गिफ्ट दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने वीरेंद्र सहेवागच्या क्रिकेट कारकिर्दीचा गौरव करताना त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. आयसीसीने वीरेंद्र सेहवागसोबतच भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी आणि श्रीलंकेचे अरविंद डिसिल्व्हा यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंच्या समावेशानंतर आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश समावेश झालेल्या खेळाडूंची संख्या ११२ झाली आहे.

(हेही वाचा – Delhi Air Pollution : दिल्लीची हवा पुन्हा प्रदुषित; हवेत विरघळले फटाक्यांचे विष )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.