Indian Air Force : भारतातच होणार लढाऊ विमानांची निर्मिती

हवाई दलाच्या तत्त्वनिष्ठ निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता एओएन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

65

भारतीय हवाई दल यापुढे आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात परदेशी बनावटीच्या विमानांचा समावेश करणार नाही. हवाई दल सध्या ११४ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले अनेकदा हवाई दलाला स्वावलंबी होण्याचे आवाहन केले आहे. हे लक्षात घेऊन आगामी काळात भारतात बनवलेल्या लढाऊ विमानांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Indian Air Force)

या विमानांची निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे भारतातच करावी लागणार असल्याचे हवाई दलाच्या वतीने सांगितले. या करारातील अत्यावश्यकतेची स्वीकृती म्हणजेच एक्झिस्टन्स ऑफ नेसेसिटी (AON) याला संरक्षण मंत्रालयाने अद्याप मान्यता दिलेली नाही. परदेशी सौद्यांसाठी, हे प्लॅटफॉर्म बाहेरून आयात करणे आवश्यक आहे की नाही हे मंत्रालय ठरवते. हवाई दलाच्या तत्त्वनिष्ठ निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता एओएन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नौदलाने आधीच स्वदेशी विमाने वापरण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या युद्धनौका देखील देशात तयार केल्या जातील.

(हेही वाचा :Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी)

गेल्या आठवड्यात मिग-21 च्या दोन स्क्वॉड्रन सेवेतून काढून टाकण्यात आल्या होत्या. यानंतर हवाई दलाने ९७ एलसीए मार्क-2 जेट विमानांच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या निर्णयात हवाई दल स्वावलंबनाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या ऑर्डरची त्वरीत पूर्तता करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (HAL) नागपुरात दरवर्षी २४ विमाने तयार करण्याची क्षमता वाढवत आहे. याशिवाय राफेल फायटरच्या 2 स्क्वाड्रनसाठी करार झाल्यानंतर हवाई दलाने आपल्याच भूमीवर बनवलेली लढाऊ विमाने उडवण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई दलाने ४८ हजार कोटी रुपये खर्च केले. या करारांतर्गत ८३ तेजस मार्क-1 खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ९७ एलसीए खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

(हेही वाचा : Road Accident : लुधियाना तब्बल १०० गाड्या एकमेकांवर आदळल्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.