BMC Public Toilets : संडासवरून आमदार आणि माजी नगरसेवकांमध्ये वाद

भांडुप पूर्व येथील मिश्रा नगर आणि किरण स्मृती चाळ येथे महापालिकेच्या टप्पा १२ अंतर्गत शौचालयाच्या काम हाती घेण्यात आले आहे.

1130
BMC Public Toilets : संडासवरून आमदार आणि माजी नगरसेवकांमध्ये वाद
BMC Public Toilets : संडासवरून आमदार आणि माजी नगरसेवकांमध्ये वाद

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून टप्पा १२ अंतर्गत शौचालयांची बांधणीच्या कामाला सुरुवात झाली असून महापालिकेच्या तत्कालिन तसेच माजी नगरसेवकांच्या शिफारशीनुसार या शौचालयांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नगरसेवकांच्या शिफारशींनुसार हाती घेतेल्या या शौचालयांच्या कामांचे श्रेय आता आमदारच घेऊ लागले आहेत. भांडुप कांजूर मार्ग येथे बांधल्या जाणाऱ्या शौचालयांचे श्रेय स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्याकडून घेतले जात आहे. त्यामुळे संडासाच्या बांधकामावरून आमदार आणि माजी नगरसेविका यांच्यात जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. (BMC Public Toilets)

भांडुप पूर्व येथील मिश्रा नगर आणि किरण स्मृती चाळ येथे महापालिकेच्या टप्पा १२ अंतर्गत शौचालयाच्या काम हाती घेण्यात आले आहे. या शौचालयाच्या कामाचे श्रेय विक्रोळी मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांच्याकडून घेतले जात आहे. या शौचालयाच्या शेजारी आमदारांनी बॅनर लावून याचे काम आपल्या प्रयत्नातून होत असल्याचे त्यावर नमुद केले आहे. आमदारांकडून बॅनर लावून न केलेल्या पाठपुराव्याचे श्रेय घेतल्याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका सारिका पवार आणि त्यांचे पती माजी नगरसेवक मंगेश पवार यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जावून पवार दाम्पत्यांने आमदार कशाप्रकारे आपली फसवणूक करून दिशाभूल करतात याची माहिती देतच आमदारांना या शौचालयांच्या बांधकामासाठी आपण केलेला पत्र व्यवहार सादर करावा म्हणून कुणी पहिला प्रयत्न केला आणि कुणी दुसऱ्याच्या प्रयत्नावर श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो हे समोर येईल असे खुले आव्हानच दिले आहे. (BMC Public Toilets)

(हेही वाचा – Terrorism : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?)

या बाबत बोलतांना माजी नगरसेवक मंगेश पवार यांनी या शौचालयाच्या बांधकामासाठी माजी नगरसेविका सारीका पवार यांच्या प्रयत्नातून उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या तर्फे महापालिकेचा निधी आणल्याचे सांगितले. ते म्हणतात, महापालिकेच्या एमएसडीपी (MSDP) टप्पा १२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या शौचालयांच्या बांधकामासाठी सर्व्हे झाला. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचा सर्व्हे झाल्यांनतर या शौचालयांची यादी तयार करण्यात आली. हा निधी मंजूर झाल्यानंतर आमदारांची सवयच आहे की आपला माणूस पाठवायचा आणि कुठली कामे मंजूर झाली त्यांच्या नावे पत्र द्यायची आणि तीच पत्र मग बॅनरवर छापायची. (BMC Public Toilets)

एक वर्षे झाले आपण यासाठी पाठपुरावा करतो, महापालिकेत याची यादी आहे, ही यादी ९ जानेवारी २०२३ बनवली, यासाठी आपले पत्र होते. मग आमदारांनी आपले पत्र दाखवावे, पत्र दिल्याची तारीख दाखवावी, पाठपुरावा कधीपासून सुरु आहे, याची माहिती द्यावी, पण उगाच लोकांची दिशाभूल करू नये, दुसऱ्याच्या कामावर किती वेळा श्रेय घेणार असा सवाल करत पवार यांनी नगरसेविका प्रामाणिक काम करते पण आम्ही कधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत नाही, आमदारांचे दोन नगरसेवक त्यांना शिवसेनेत गेले, त्यामुळे नगरसेवकांना त्यांचे काम करून द्या, आणि जर आपल्याला नगरसेवकांच्या कामांचे श्रेय घ्यायचे असेल तर आपण नगरसेवक म्हणून निवडून यावे आणि काम करावे, असेही आव्हान पवार यांनी दिले. (BMC Public Toilets)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.