Cosmetics : सौंदर्यप्रसाधने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरणे ठरतेय धोकादायक

79

जाहिरातींमधील प्रलोभनांना भुलून बाजारात सडपातळ शरीरयष्टीसाठी आणि शरीरावरील सुरकुत्या जाण्यासाठी थेट ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून औषधे घेणाऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. यात महागड्या सौंदर्य प्रसाधानांचाही समावेश आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांचा उपयोग करू नये असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

 30 ते 40 वयोगटातील ऑनलाइन मार्केटिंगचा वापर करणाऱ्या वयोगटात डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे आणि सौंदर्यप्रसाधने, शरीरावरील तत्सम मलम लावण्याचे प्रमाण अधिक जास्त आहे. समाजमाध्यमांवर येणाऱ्या जाहिरातींना भुलून उत्पादने थेट घरी मागवण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. सतत मोबाईलवर असल्याने मानेकडील भागांत तरुणांना सुरकुत्या दिसून येत आहेत. बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाही तरुणांमध्ये वाढू लागला आहे. खाण्याचे अवेळी प्रमाण, ऍसिडिटी या समस्यांमुळे तरुणांमध्ये केस गळतीचे प्रमाणही जास्त आहे. रात्रभर अंधारात मोबाईलची लाईट सुरु राहिल्याने डार्क सर्कलच्या तक्रारी सर्वात जास्त असल्याचे डर्मेटोलॉजीस्ट सांगतात.

भारत हा जगभरात सौंदर्य प्रसाधनांची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. परदेशात बनवलेल्या सौंदर्य प्रसाधनांना भारतात सर्वात जास्त मागणी आहे. परदेशातील विविध स्किन केअर ब्रॅण्ड्सही तरुण-तरुणी डॉक्टरांच्या सल्ला शिवाय थेट वापरायला सुरुवात करतात. प्रत्येक चेहऱ्याचा प्रकार वेगवेगळा असतो. बरेचदा डॉक्टर रुग्णाच्या त्वचेची तपासणी करून शास्त्रीय सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वचेवर लावलेली औषधे आणि सौंदर्यप्रसाधने रुग्णांना त्रासदायक ठरत नाही. कित्येकदा रुग्णांना मशीनद्वारे दिल्या जाणाऱ्या उपचारांचीही गरज भासते.

(हेही वाचा I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दिले जाणारे वैद्यकीय उपचार

लठ्ठपणा कमी करण्यासाठी बाजारात आता अनेक औषधे उपलब्ध आहेत. औषधांच्या सेवनाने सकारात्मक परिणाम दिसून येत नसेल तर डॉक्टर बॅरियट्रिक शस्त्रक्रिया करतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपलब्ध वैद्यकीय उपचार

चेहरा, मान या दर्शन या भागांवर सुरकुत्या वाढू लागल्यास बोटक्स उपचार दिला जातो. आजकल ही उपचार पद्धती फार प्रभावीपणे वापरली जात आहे.

केस गळतीवर उपलब्ध वैद्यकीय उपचार

केस गळतीवर रुग्णांना ट्रायकॉलॉजीस्ट उपचार देतात. बरेचदा रुग्ण पैसे वाचवण्यासाठी डर्मेटोलॉजिस्टकडूनच केसांचे उपचार करून घेतात. केसांच्या सर्व समस्यांवर ट्रायकॉलॉजीस्ट चांगले उपचार देतात. मात्र केसांच्या विविध समस्यांवरील उपचार फारच महागडे असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.